सोलापूर जिल्ह्यातील ७४ करदात्यांनी मागे घेतले कर्जमाफीचे अर्ज, अजनाळे, कमलापूर,सोनंद, बारलोणीच्या अनेकांचा यामध्ये समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:50 AM2017-11-15T11:50:18+5:302017-11-15T11:51:45+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरलेल्यांपैकी जिल्ह्यातील ७४ लोकांनी कर्जमाफीचा फायदा नको असे अर्ज दिले असून, हे शासकीय व निमशासकीय सेवेतील करदाते आहेत.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १५ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरलेल्यांपैकी जिल्ह्यातील ७४ लोकांनी कर्जमाफीचा फायदा नको असे अर्ज दिले असून, हे शासकीय व निमशासकीय सेवेतील करदाते आहेत.
राज्य शासनाने शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. त्यानुसार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल करावयाचे होते. शासनाने शासकीय व निमशासकीय नोकर, करदाते तसेच संस्थांच्या पदाधिकाºयांना यातून वगळले होते. अशातही काहींनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी काहींच्या लक्षात आल्याने त्यांनी कर्जमाफीचा फायदा नको म्हणून अर्ज दिले आहेत. या अर्जदारांना चावडीवाचनात आक्षेप आल्याने वगळण्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने वरिष्ठांना कळविले आहे. मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगीचे दोन, अक्कलकोट तालुक्यातील केगाव बु., दक्षिण सोलापूर तालुक्यातील कणबस(ग), मोहोळ तालुक्यातील नजीकपिंपरी, उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव, माळशिरस तालुक्यातील तांबवेच्या प्रत्येकी एका शेतकºयाचा समावेश आहे. सांगोला तालुक्यातील अजनाळेचे सर्वाधिक १३ शेतकरी खातेदारांनी कर्जमाफीचा फायदा नाकारला आहे. यलमार मंगेवाडीचे तीन, कमलापूरचा एक, खवासपूरचे पाच, महिमचे चार,वाकीघेरडीचे दोन, सोनंदचे आठ आदी शेतकºयांची नावे चावडीवाचनात कमी करण्याची शिफारस केली आहे. बार्शी तालुक्यातील बार्शी शहरातील तीन, ज्योतीबाचीवाडीचा एक, शेळगाव(आर) व काटेगावचे प्रत्येकी दोन, कळंबवाडी पान, खामगाव,कोरफळे, मुंगशी(आर), रुई, रऊळगाव,वालवड प्रत्येकी एक, पंढरपूर तालुक्यातील करकंब व कोर्टी प्रत्येकी एक, माढा तालुक्यातील ढवळस, जाधववाडी मो. प्रत्येकी एक, बारलोणीचे १० तर करमाळा तालुक्यातील मलवडीचा एक तर केत्तूर येथील पती-पत्नी अशा दोघांचा कर्जमाफी नाकारणाºयांमध्ये समावेश आहे.
---------------------
नोकरदार अन् पदाधिकारी...
शासनाने ज्यांना कर्जमाफीचा फायदा घेता येणार नाही अशांची यादी अगोदरच जाहीर केली होती. असे असतानाही अनेक करदात्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले आहेत. अगोदर अर्ज भरुन नंतर चूक लक्षात आल्याने ७४ शेतकरी, नोकरदार, पदाधिकाºयांनी अर्जाद्वारे लाभ नाकारला आहे. अनेकांनी अशातही अर्ज भरले असून, आता तपासणीत असे लोक अडचणीत येण्याची शक्यता आहे. लाभ नाकारणाºयांमध्ये शासकीय नोकरदार, निमशासकीय कर्मचारी, मजूर संस्थांचे अध्यक्ष, निवृत्तीवेतन धारक, आयकरदाता, पतसंस्था पदाधिकारी आदींचा समावेश आहे.