माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 11:19 AM2024-11-27T11:19:22+5:302024-11-27T11:19:59+5:30

राज्य पातळीवरील मुद्यासह स्थानिक मुद्दे उचलून धरण्यात अभिजीत पाटील यांनी यश मिळवले.

An announcement from ncp abhijeet patil in the Madha election turned out to be a game changer | माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?

माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?

गणेश पोळ, माढा: माढा विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीने मतदान झाल्याने अभिजीत पाटील विरूद्ध रणजितसिंह शिंदे अशी असली तरी पवार विरुद्ध शिंदे अशीच लढत झाली. महायुतीकडून मीनल साठे यांच्यासह तिरंगी लढत झाली असली तरी महायुतीतील घटक पक्षांनी मीनल साठे यांना बगल देत अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांच्या पाठीमागे ताकद लावलेली दिसून आली. मात्र राज्य पातळीवरील मुद्यासह स्थानिक मुद्दे अभिजीत पाटील यांनी उचलून धरण्यात यश मिळवले. पाटील यांनी केलेली ऊसदराची घोषणा गेमचेंजर ठरली. तसंच शरद पवार यांची सहानुभूती व शैक्षणिक आरोग्य व भौतिक सुविधा यावर प्रचारात पाटील यांनी भर दिला. तर रणजितसिंह शिंदे यांनी आ. बबनराव शिंदे यांनी केलेली सिंचनाची कामे सिना-माढा उपसा सिंचन व वाढवलेले उसाचे क्षेत्र गेल्या ३० वर्षात माजी आ. बबनराव शिंदे यांनी केलेला विकास कामे यावर भर दिला. 

माढा तालुक्यातील कोंढार पट्टा, टेंभूर्णी, मानेगाव, उपळाई, मोडनिंब आदी भागात अभिजीत पाटील यांना मतदारांचा प्रश्नांना हात घालण्यात यश आल्याचे दिसून आले. माढा विधानसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टर व ओबीसी फॅक्टरचा प्रभाव दिसला. याचा फटका करमाळा व माढा मतदारसंघात शिंदे घराण्याचा झालेल्या पराभवाचे कारण ठरले.

जनता एकीकडे नेते दुसरीकडे 

लोकसभेप्रमाणे माढा तालुक्यातील तसेच पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल व पांडुरंग परिवारातील नेते रणजितसिंह शिंदे यांच्या प्रचारात होते. बबनराव शिंदे यांनी शिंदे यांचे पारंपरिक विरोधक टेंभूर्णीचे भाजपा ता. योगेश बोबडे यांचा गट, प्रा. शिवाजी सावंत गट, जि. प. माजी सभापती शिवाजी कांबळे यांना एकत्र करण्यात यश मिळवले तर पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांत देखील अभिजीत पाटील यांचे विरोधातील पांडुरंग व विठ्ठल परिवारातील नेत्यांना एकत्रित करण्यात यश मिळवले होते. या दोन्ही परिवारातील काळे गटाचे समाधान काळे, प्रणव परिचारक, गणेश पाटील, युवराज पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत अभिजीत पाटील यांना कडाडून विरोध केला होता.

Web Title: An announcement from ncp abhijeet patil in the Madha election turned out to be a game changer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.