वाढीव वीस टक्के अनुदान मंजूर; ३४ शाळांमधील ५४ शिक्षकांना लाभ
By बाळकृष्ण दोड्डी | Published: April 2, 2023 07:51 PM2023-04-02T19:51:50+5:302023-04-02T19:52:10+5:30
जिल्ह्यातील ५४ शिक्षकांना वाढीव अनुदान मिळणार आहे. याबाबत शासनाने ६ फेब्रुवारी रोजी आदेश काढून घोषित व अघोषित व वाढीव टप्पा अनुदान पात्र शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अनुदान वितरित करण्याची सूचना केली आहे
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : खासगी अंशत: अनुदानित ३४ प्राथमिक शाळांना वाढीव टप्पा अनुदान वितरित करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले असून प्राथमिक शिक्षणाधिकारीमार्फत मंजूर वाढीव अनुदान वितरित होणार आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने शासनाकडे पाठपुरावा केला असून यास यश मिळाल्याची माहिती संघटनेचे महासचिव सुनील चव्हाण व सोमेश्वर याबाजी यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील ५४ शिक्षकांना वाढीव अनुदान मिळणार आहे. याबाबत शासनाने ६ फेब्रुवारी रोजी आदेश काढून घोषित व अघोषित व वाढीव टप्पा अनुदान पात्र शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अनुदान वितरित करण्याची सूचना केली आहे. याचा जिल्ह्यातील ३४ शाळेतील ५४ शिक्षकांना होणार आहे. वीस टक्क्यांवरून चाळीस टक्के अनुदानाचा लाभ अकरा शाळांतील २६ शिक्षकांना होणार असून चाळीस टक्क्यांवरून साठ टक्के अनुदानास पात्र ८ शाळांतील २८ शिक्षकांना हाेणार आहे.