एटीएम मधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने वृध्दाला फसविले
By रूपेश हेळवे | Published: June 10, 2023 04:28 PM2023-06-10T16:28:42+5:302023-06-10T16:29:25+5:30
सोलापूर : एटीएम मधून पैसे काढून देण्यास मदत करतो, असे सांगत एटीएम कार्डाची अदलाबदल करत वृध्दाच्या खात्यातून ४७ हजार ...
सोलापूर : एटीएम मधून पैसे काढून देण्यास मदत करतो, असे सांगत एटीएम कार्डाची अदलाबदल करत वृध्दाच्या खात्यातून ४७ हजार रूपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी तात्यासाहेब दामोदर जमदाडे ( वय ६०, रा. वडाळा, उत्तर सोलापूर ) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून एका अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी जमदाडे हे डफरीन चौकातील एटीएम मध्ये ३१ मे रोजी पैसे काढण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथे असलेल्या इसमाने त्यांना जमदाडे यांना मदत करण्याच्या बहाण्याने जवळ येऊन पिन कोड पाहिले. त्यानंतर पैसे निघत नाहीत असे सांगितले.
दरम्यान त्याने एटीएम कार्डची अदला बदली करतत्यांच्या खात्यातून ४७ हजार १०० रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात चोरावर सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई माळी करत आहेत.