आनंदमाया उद्योग समूह करणार ११ मुलांचा शैक्षणिक खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:21 AM2021-03-18T04:21:17+5:302021-03-18T04:21:17+5:30

यावेळी श्रीदत्त विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील सात, सुस्ते येथील झेडपी शाळा २ व चव्हाणवस्ती झेडपी शाळेतील दोन विद्यार्थी अशा ...

Anandmaya Industries Group will cover the educational expenses of 11 children | आनंदमाया उद्योग समूह करणार ११ मुलांचा शैक्षणिक खर्च

आनंदमाया उद्योग समूह करणार ११ मुलांचा शैक्षणिक खर्च

Next

यावेळी श्रीदत्त विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील सात, सुस्ते येथील झेडपी शाळा २ व चव्हाणवस्ती झेडपी शाळेतील दोन विद्यार्थी अशा अकरा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांचा पुढील पाच वर्षे शैक्षिणक खर्च आनंदमाया उद्योग समूह करणार आहे. तसेच पाच वर्षात मागासवर्गीय कुटुंबातील कमीत कमी ५१ हुशार आणि होतकरू गरीब व गरजू मुले दत्तक घेऊन त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च करणार असल्याचेही आनंदमाया उद्योग समुहाचे संतोष बोबडे यांनी सांगितले.

यावेळी माजी सरपंच बाळासाहेब लोकरे, माजी उपसरपंच अनिल घाडगे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बोबडे, आनंदमाया उद्योग समुहाचे प्रमुख राजेंद्र बोबडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप चव्हाण, संतोष बोबडे, अभिजीत घाडगे, सोसायटीचे उपाध्यक्ष संभाजी चव्हाण, शिवसेनेचे हणमंत चव्हाण, विशाल फडतरे, दत्तात्रय चव्हाण, विजय चव्हाण, कुमार वाघमोडे, प्रसाद करपे, श्री दत्त विद्या मंदिरचे प्राचार्य आर. डी. पाराध्ये, पर्यवेक्षक टी. ए. कौलगे, ए. एम. बनसोडे, व्ही. एस. दराडे, एस. वाय. इंगोले, आर. डी. शिनगारे, एस. पी. फडतरे, एन. एम. वायदंडे, एस. एस. इंगळे, पी. व्ही. जाहीर, व्ही. एस. म्हेत्रे, डी. एस. भाजीभाकरे, एम. व्ही. देशमुख, एस. के. चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. एम. जाधव यांनी केले.

Web Title: Anandmaya Industries Group will cover the educational expenses of 11 children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.