विठ्ठल मंदिरातील प्राचीन धोकादायक पिंपळाचे झाड तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:20 AM2021-01-22T04:20:35+5:302021-01-22T04:20:35+5:30
श्री विठ्ठल मंदिरातील महालक्ष्मी मंदिर, गणपती, व्यंकटेश, बाजीराव पडसाळी या ठिकाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळ्या गेल्या आहेत. यामुळे त्या मंदिरांना ...
श्री विठ्ठल मंदिरातील महालक्ष्मी मंदिर, गणपती, व्यंकटेश, बाजीराव पडसाळी या ठिकाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळ्या गेल्या आहेत. यामुळे त्या मंदिरांना ते झाड धोकादायक ठरत होते. हे झाड तोडण्यासाठी पुरातन विभागाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. मंदिर समितीच्या बैठकीमध्ये झाड काढण्याचा विषय मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी झाड तोडण्यात आले.
हे झाड दर्शन रांगेच्या मार्गावर होते. यामुळे सुरक्षेचा भाग म्हणून काहीकाळ दर्शन रांगेचा मार्गदेखील बदलण्यात आला होता. झाड तोडण्यासाठी १५ हजार रुपये खर्च करण्यात आला. त्याचबरोबर झाड तोडणाऱ्यालाच लाकडे घेऊन जाण्यास सांगितले असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
----
फोटो : विठ्ठल मंदिरातील बाजीराव पडसाळी शेजारी असलेले धोकादायक पिंपळाचे झाड तोडण्यात येत आहे. (छाया सचिन कांबळे)