प्राचीन मूर्तींना रासायनिक रंग लावू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:31+5:302021-06-27T04:15:31+5:30
वडवळ येथील नागनाथ मंदिरासमोर शिवपुजे यांच्या दुकानाशेजारी असलेल्या मूर्ती या नरसोबाची नसून त्या वीरभद्र भैरव, क्षेत्रपाल यांच्या आहेत असा ...
वडवळ येथील नागनाथ मंदिरासमोर शिवपुजे यांच्या दुकानाशेजारी असलेल्या मूर्ती या नरसोबाची नसून त्या वीरभद्र भैरव, क्षेत्रपाल यांच्या आहेत असा दावा माशाळकर यांनी केला आहे. याविषयी सांगताना ते म्हणाले की, वडवळ हे शैव पंथीयांचे ठिकाण होय. नागनाथ म्हणजेच साक्षात शिवाचा अवतार अशी मान्यता असल्याकारणाने या परिसरात अनेक शैव पंथीय मूर्ती पाहावयास मिळतात. त्यापैकीच ही नरसोबाची मूर्ती नसून वीरभद्र भैरवाची मूर्ती होय. सध्या या मूर्तीला शेंदूर लेपण झाल्याने तिच्या मूळ स्वरूपात बदल झालेला आहे.
----
वडवळ ही नागेश संप्रदायाची भूमी असल्याने येथील विविध मूर्तीच्या प्रभावळीवर, अलंकाराच्या ठिकाणी, मुकुटावर, नाग दिसून येतात. शिवाच्या भैरव अवताराच्या एकूण १०८ नावाची नामावली प्राप्त असून उपरोक्त वर्णन शिवाच्या वीरभद्र भैरव अवताराशी मिळते. त्यामुळे ही मूर्ती वीरभद्राची ठरते.
- डाँ.धम्मपाल माशाळकर मूर्तीअभ्यासक, मोडीलिपी व धम्मलिपी तज्ज्ञ सोलापूर
----
फोटो : २६ वडवळ