...अन् रेमडेसिविरच्या व्यवहारावर चुकचुकली संशयाची पाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:17 AM2021-04-29T04:17:23+5:302021-04-29T04:17:23+5:30
करमाळा शहरातील डॉ. पवार यांना पंचायत समितीमधील कर्मचारी जाधव यांनी पाच रेमडेसिविर इंजेक्शन विकले असल्याचा दावा क्लिपमध्ये केला ...
करमाळा शहरातील डॉ. पवार यांना पंचायत समितीमधील कर्मचारी जाधव यांनी पाच रेमडेसिविर इंजेक्शन विकले असल्याचा दावा क्लिपमध्ये केला आहे. डॉक्टरने या इंजेक्शनचे १७ हजार रुपये दिले असल्याचे म्हटले असून, बाकीचे ७ हजार रुपये कधी देता, अशी विचारणा केली आहे. डॉ. पवार यांनी ५ हजार रुपये देतो, असे कबूल केल्याचे क्लिपमध्ये आहे. कोरोनाच्या उपचारामध्ये सध्या रेमडेसिविर इंजेक्शनला महत्त्व प्राप्त झाल्याने या क्लिपमुळे करमाळ्यात खळबळ माजली आहे.
या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी अनेकांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
-----
सहा महिन्यांपूर्वी जाधव यांच्या पत्नीना कोरोना झाला होता. अहमदनगर येथे उपचार केल्यानंतर राहिलेले शिल्लक रेमडेसिविर इंजेक्शन त्यांचा मुलगा स्वप्निल याने मला त्यावेळीच आणून दिले होते. त्याचे पैसेही आपण दिले; पण काही पैसे राहिलेले होते. ते पैसे मला कॉल करून त्यांनी मागितले.
- डॉ. रविकिरण पवार, करमाळा
----
आई कोरोनाबाधित झाल्यानंतर उपचारासाठी रेमडेसिविर आणले होते. उपचारानंतर राहिलेले शिल्लक रेमडेसिविर ठेऊन काय करायचे म्हणून डॉ. पवारांना आणलेल्या किमतीमध्येच दिले होते. या गोष्टीला सहा महिने झाले. याचे संपूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे आहे.
- स्वप्नील जाधव, करमाळा.
----
शासनस्तरावरून प्राप्त रेमडेसिविर इंजेक्शनचा कोणताही काळाबाजार झालेला नाही. व्हायरल क्लिपमधील रेमडेसिविर इंजेक्शन व शासनाकडून प्राप्त झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काहीही संबंध नाही. मात्र, व्हायरल क्लिपनुसार संबंधिताची चौकशी करण्याचे आदेश पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- समीर माने, तहसीलदार, करमाळा.