अन् तिने दिला रेल्वेत बाळाला जन्म
By appasaheb.patil | Published: February 15, 2020 11:53 AM2020-02-15T11:53:53+5:302020-02-15T11:58:25+5:30
मदुराई एक्स्प्रेसमधील घटना; बाळ आणि आई दोघेही सुखरुप, मध्य रेल्वेतील लोहमार्ग पोलिसांची मदत
सोलापूर : मुंबई ते तामिळनाडू प्रवास करणाºया महिलेने सोलापूर-कुर्डूवाडीदरम्यान रेल्वेतच एका बाळाला जन्म दिला़ ही घटना शुक्रवार १४ फेबु्रवारी २०२० रोजी सकाळी सातच्या सुमारास सोलापूर-कुर्डूवाडीदरम्यानच्या प्रवास काळात घडली.
तामिळनाडू येथील ममसाकरम, ता़ विरुध्दनगर येथे राहणारी अभिनया मुचू पांडे ही २२ वर्षीय गर्भवती महिला आपल्या कुटुंबीयांसमवेत मदुराई एक्स्प्रेसने मुंबईहून तामिळनाडूकडे जात होती़ मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर-कुर्डूवाडीदरम्यान अभिनया हिला त्रास होऊ लागला़ त्यावेळी तिच्यासोबत असलेल्या कुटुंबीयांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला़ शिवाय रेल्वेतील वैद्यकीय पथकाची मदतही घेतली, मात्र अतिवेदना होत असल्याने तिने रेल्वेतच शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बाळाला जन्म दिला़ यावेळी माणुसकीचा हात देत रेल्वेत प्रवास करणाºया महिलांनीही संबंधित महिलेच्या प्रसूतकाळात मदतीचा हात दिला.
या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ संबंधित पांडे कुटुंबीयांना मदतीचा हात दिला़ मदुराई एक्स्प्रेस ही सोलापूर रेल्वे स्थानकावर आल्यावर रुग्णवाहिकेच्या मदतीने पुढील उपचारासाठी त्या महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यानंतर शासकीय रुग्णालयातील डॉ़ पल्लवी मोहिते यांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले़ उपचारानंतर ती महिला व बाळ सुखरूप असल्याचे संबंधित वैद्यकीय पथकाने सांगितले़ याबाबतची नोंद शासकीय रुग्णालय पोलीस चौकीत व लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे.