आंध्र, तामिळनाडूत दूधाला सर्वाधिक दर; चांगला दर देण्यात महाराष्ट्रातील दूध संघ मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:35 PM2021-02-22T16:35:40+5:302021-02-22T16:35:49+5:30

सोलापूर : गाईच्या दूध खरेदी दरात वरचेवर वाढ होत असताना महाराष्ट्रातील दूध संघापेक्षा आंध्र प्रदेश व तामिळनाडूचे संघ अधिक ...

Andhra, Tamil Nadu has the highest milk prices; Maharashtra's milk team lags behind in giving good rates | आंध्र, तामिळनाडूत दूधाला सर्वाधिक दर; चांगला दर देण्यात महाराष्ट्रातील दूध संघ मागे

आंध्र, तामिळनाडूत दूधाला सर्वाधिक दर; चांगला दर देण्यात महाराष्ट्रातील दूध संघ मागे

googlenewsNext

सोलापूर: गाईच्या दूध खरेदी दरात वरचेवर वाढ होत असताना महाराष्ट्रातील दूध संघापेक्षा आंध्र प्रदेश व तामिळनाडूचे संघ अधिक दर देत आहेत. सर्वच खासगी दूध संघाचा दूध खरेदी दर प्रति लिटर ३० रुपयापेक्षा अधिक झाला असला तरी यापेक्षा अधिक दर मिळत असल्याने इतर राज्यातील संघाला दूध पुरवठा वाढत आहे.

खासगी मालकी झालेल्या दुधाचे दर कधी वाढवतील व वाढलेला दर कधी अन् किती खाली आणतील याचा भरवसा राहिला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी गोधन कमी केले आहे. याचा फटका दूध संकलनावर होत आहे. त्यामुळे दूध दरात मागील तीन महिन्यापासून वाढ होत आहे. महाराष्ट्रातील खासगी दूध उत्पादक संघ सध्या प्रति लिटर २९ -३० रुपयाने दुधाची खरेदी आहेत. मात्र, आंध्रप्रदेश व तामिळनाडूचे खासगी दूध संघ त्यापेक्षा अधिक दर देत आहेत. तामिळनाडूची तिरुमला व हॅटसन डेअरी थेट शेतकऱ्यांना ३१ रुपये व त्यापेक्षा अधिक दर देत आहेत. दुधाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन जमा करणाऱ्या आंध्र प्रदेशच्या डोटला डेअरीचा दर प्रति लिटर ३३ ते ३५ रुपयापर्यंत मिळत आहे. मात्र महाराष्ट्रातील दूध संस्था यापेक्षा कमी दर देत आहेत. यामुळे जिल्ह्यातून आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या दूध संघाच्या संकलनात वाढ होत असल्याचे सांगण्यात आले.

रानमसलेत ३८ रुपये दर

  • उत्तर तालुक्यातील रानमसले येथे डोटला दूध डेअरीचे संकलन केंद्र आहे. येथे फॅट चांगली बसलेल्या दुधाला प्रति लिटर ३८ रुपये ४० पैसे दर मिळाला आहे. काही शेतकऱ्यांना ३७ रुपये इतका दर मिळत असल्याचे सांगण्यात आले.
  • - महाराष्ट्रातील खासगी संघ दूध संकलन करणाऱ्यांना अधिक कमिशन (प्रति लिटर दोन रुपये) देतात मात्र शेतकऱ्यांना दर कमी देतात.
  • -आंध्रप्रदेश व तामिळनाडूच्या संस्था शेतकऱ्यांना अधिक दर देतात शिवाय थेट खात्यावर ऑनलाईन पैसे जमा करतात व दूध संकलन करणाऱ्या संस्थांना प्रति लिटर ४० ते ६० पैसे कमिशन देतात.

कोरोनाचे संकट घोंगावतेय

राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा येत असल्याने दुधाच्या दरात पुन्हा घसरण होईल असे सोनाई दूध संघाचे दशरथ माने यांनी सांगितले. मुंबई, पुणे या मोठ्या शहरात संचारबंदी लागू झाली तर दूध विक्रीवर मोठा परिणाम होणार असल्याचे माने यांनी सांगितले.

 

Web Title: Andhra, Tamil Nadu has the highest milk prices; Maharashtra's milk team lags behind in giving good rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.