लायन्सने दत्तक घेतलेल्या दडशिंगेत अंगणवाडी, शाळा, स्मशानभूमीचे होणार सुशोभीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:24 AM2021-08-15T04:24:28+5:302021-08-15T04:24:28+5:30
बार्शी : तालुक्यातील दडशिंगे गाव बार्शीच्या लायन्स क्लबने दत्तक घेतले आहे. गावातील अंगणवाडी, शाळा, स्मशानभूमी याचे सुशोभीकरण करण्याची ग्वाही ...
बार्शी : तालुक्यातील दडशिंगे गाव बार्शीच्या लायन्स क्लबने दत्तक घेतले आहे. गावातील अंगणवाडी, शाळा, स्मशानभूमी याचे सुशोभीकरण करण्याची ग्वाही क्लबचे अध्यक्ष ॲड. विकास जाधव यांनी दिली. यावेळी भोजराज निंबाळकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी प्रांतपाल जितेंद्र माढेकर, नंदकुमार कल्याणी, सरपंच सचिन गोसावी, ग्रामसेवक मेघना पाटील, प्रकल्प प्रमुख गिरीश शेटे, बापू कदम, अक्षय बंडेवार, संतोष जोशी, विलास पाटील, अध्यक्ष काकासाहेब काळे, प्रशांत पंडित, दिनेश श्रीमाळ, जयप्रकाश भराडिया, गोविंद तापडिया, गोवर्धनदास जाजू, शिवशंकर ढवण, पंडित मिरगणे, पांडुरंग घोलप, विकास माने, आलम मुलाणी, काकासाहेब घोलप, पांडुरंग रामकिसन घोलप, मनोज घोलप, समाधान गोसावी, दत्ता घोलप, आर्यन घोलप, ओमराजे गोसावी, भारत काळे, विक्रम घोलप, मंदाकिनी काळे, पुष्पा रांजणकर, सोनाली गोसावी आदी उपस्थित होते.
---