कोरोनाचा बळी ठरलेल्या अंगणवाडी सेविकेस ५० लाखांचा विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:11+5:302021-06-02T04:18:11+5:30
कोरोनाच्या कामादरम्यान मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून ५० लाखांचा विमा दिला जातो. यासाठी पाच प्रस्ताव पाठवले गेले होते. त्यांच्या ...
कोरोनाच्या कामादरम्यान मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून ५० लाखांचा विमा दिला जातो. यासाठी पाच प्रस्ताव पाठवले गेले होते. त्यांच्या वारसांना शासनाकडून ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे. एकात्मिक बाल सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, मुंबईचे आयुक्त इंद्रा मालो यांनी ३१ मे २०२० रोजी आदेश काढला आहे. दरम्यान, पितापूर येथील अंगणवाडी सेविका हलीमाबी इसाक सगरी यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र १५ मे २०२० रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
---
मागील वर्षी पितापूर येथील अंगणवाडी सेविका हलीमाबी सगरी यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. लागणारी कागदपत्रे तयार करून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. नुकतेच ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे. लवकरच धनादेश देण्यात येणार आहे.
- बालाजी अल्लडवाढ, बालविकास प्रकल्प अधिकारी.
---------