अंगणवाडी सेविकांचे मोबाइल वापसीसाठी मंगळवेढ्यात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:23 AM2021-08-29T04:23:10+5:302021-08-29T04:23:10+5:30
अंगणवाडीसेविकांना शासनाकडून बालकांना नवीन ज्ञान अवगत करण्यासाठी मोबाइल दिले होते. प्रामुख्याने यामध्ये सर्व माहिती इंग्रजीत असल्यामुळे अडचणी येत आहेत. ...
अंगणवाडीसेविकांना शासनाकडून बालकांना नवीन ज्ञान अवगत करण्यासाठी मोबाइल दिले होते. प्रामुख्याने यामध्ये सर्व माहिती इंग्रजीत असल्यामुळे अडचणी येत आहेत. याचे मराठीतून ट्रेनिंग दिले जावे व चांगल्या दर्जाचे मोबाइल देण्यात यावेत, एका रिचार्जवर डाटा पुरत नाही, त्यासाठी उच्च प्रतीचे मोबाइल द्यावेत, अशी मागणी सेविकांची आहे.
शासनाने दिलेले मोबाइल हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ते सुस्थितीत चालत नसल्याचा अंगणवाडीसेविकांचा आरोप आहे. मंगळवेढा तालुक्यातील २६४ सेविकांनी मोबाइल वापसी आंदोलन करून याबाबतचे निवेदन सांख्यिकी विस्तार अधिकारी प्रशांत जाधव यांना दिले. हे आंदोलन सोलापूर जिल्हा अंगणवाडी महिला युनियनच्या अध्यक्षा पार्वती स्वामी व कल्पना कांबळे-गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
कोट ::::
पंढरपूर, कुर्डूवाडी येथे अधिकाऱ्यांनी मोबाइल स्वीकारले. मात्र मंगळवेढ्यात स्वीकारले नाहीत. याबाबत महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष लवकरच मंगळवेढ्यास भेट देणार आहेत. पंढरपूर व मंगळवेढा येथे एकच अधिकारी असताना पंढरपूरला मोबाइल स्वीकारले जातात. मात्र मंगळवेढ्यात स्वीकारले जात नसल्यामुळे अधिकाऱ्यांची दुटप्पी भूमिका दिसून येते आहे.
- पार्वती स्वामी
अध्यक्षा, सोलापूर जिल्हा अंगणवाडी महिला युनियन
कोट :::
मंगळवेढ्यातील इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. रात्रीच्या वेळी येथे शिपाई नाही. अशा परिस्थितीत २६४ मोबाइल येथे ठेवणे धोक्याचे आहे.
- अमृतराज सरडे
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, मंगळवेढा
ओळी :
मंगळवेढ्यातील अंगणवाडीसेविकांनी मोबाइल वापसीसाठी आंदोलन करतानाचे छायाचित्र.