अंगणवाडी सेविकांनी निकृष्ट मोबाईल केले जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:23 AM2021-08-29T04:23:08+5:302021-08-29T04:23:08+5:30
मोहोळ : अंगणवाडीचे कामकाज जलद व सुखकर व्हावे यासाठी मागील सरकारच्या वतीने अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्यात आले; मात्र काही ...
मोहोळ : अंगणवाडीचे कामकाज जलद व सुखकर व्हावे यासाठी मागील सरकारच्या वतीने अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्यात आले; मात्र काही वर्षांनंतर या मोबाइलच्या संदर्भात अंगणवाडी सेविकांच्या तक्रारी वाढल्या. मोहोळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी शासनाने दिलेले मोबाइलचे बॉक्स भरुन ते बॉक्स एकात्मिक बालविकास अधिकारी किरण सूर्यवंशी यांच्याकडे जमा केले.
अंगणवाडी सेविकांच्या मोबाइलच्या तक्रारी पंचायत समितीच्या सभापती रत्नमाला पोतदार यांनी जाणून घेतल्या. यावेळी उपसभापती अशोक सरवदे, एकात्मिक बालविकास अधिकारी किरण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी सूर्यमणी गायकवाड , महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनने घोषणाबाजी केली. या आंदोलनात सुमारे ३०० अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.या आंदोलनामध्ये वेणूताई वाघमोडे,अनुसया राठोड,वनिता पाटील,शोभा कुंभार,किस्किंदा हांडे,अर्चना गावडे,उमा खराडे,कमल व्हनमाने,सविता पाटील,सुलभा जावळे,उमा सलगर,अलका व्यवहारे,कल्पना चव्हाण,दीपाली ढोबळे,रंजना जाधव, संगीता वाघमोडे आदी अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या
----
फोटो : २७ मोहोळ स्ट्राईक
अंगणवाडी सेविकांनी एकात्मिक बालविकास अधिकाऱ्याकडे मोबाईल जमा केले.
----