बार्शी तालुक्यातील आरोग्य कर्मचाºयांच्या संतापले; काय आहे कारण जाणून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:24 AM2020-09-10T11:24:21+5:302020-09-10T11:25:47+5:30
दोन महिन्यांत दोनदा कोरोना टेस्ट निगेटिव्ह तरीही १९ कैदी सेंटरमध्येच
बार्शी : पॉझिटिव्ह कैद्यांची दोनवेळा केलेली टेस्ट निगेटिव्ह येऊन ते कोविड सेंटरमध्येच आहेत़ त्यांचा आम्हाला त्रास होत असल्याच्या तक्रारी बार्शीच्या आरोग्य कर्मचाºयांनी केल्या आहेत़ बार्शी सबजेलमधील २६ कैदी पुन्हा जेलमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे.
१ व ३ जुलै रोजी हे २६ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयाशेजारी असलेल्या शासकीय वसतिगृहात दाखल केले़ यातील कोणत्याच कैद्याला जास्त लक्षणे दिसत नसल्याने त्रास झाला नाही़ रुटीन उपचारानंतर ते बरे झाले़ आजपर्यंत या सर्व कैद्यांची दोनवेळा कोरोना टेस्ट करण्यात आली़ दोन्ही वेळेस त्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत़ दरम्यान, २६ पैकी ७ कैद्यांना जामीन झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे़ उर्वरित १९ कैदी या ठिकाणी आहेत़ यापूर्वी आरोग्य विभागाने बैठकीत व लेखी पत्र देऊन या कैद्यांना सबजेलमध्ये स्थलांतरित करावे, अशी मागणी केली आहे.
आम्ही याबाबत आरोग्य विभागाकडून कैद्यांच्या टेस्ट संदर्भात माहिती मागवली आहे़ सबजेल दररोज सॅनिटाईज केले जात आहे़ आरोग्य विभागाचा अहवाल येताच कैद्यांना कोविड सेंटरमधून सबजेलमध्ये हलविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल़
- किरण जमदाडे,
प्रभारी तहसीलदार, बार्शी