अंकोलीची भैरवनाथ यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:17 AM2021-05-03T04:17:19+5:302021-05-03T04:17:19+5:30
चैत्र शुद्ध कालाष्टमीच्या दिवसापासून सलग तीन दिवस उत्साही वातावरणात ही यात्रा साजरी केली जाते. या यात्रेसाठी सोलापूरसह सांगली, सातारा, ...
चैत्र शुद्ध कालाष्टमीच्या दिवसापासून सलग तीन दिवस उत्साही वातावरणात ही यात्रा साजरी केली जाते. या यात्रेसाठी सोलापूरसह सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई व उस्मानाबाद जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात; परंतु गतवर्षीपासून कोरोना संसर्गामुळे ही यात्रा रद्द करावी लागत आहे. या यात्रा काळात होणारे कार्यक्रमही रद्द केले आहेत. मात्र, धार्मिक विधी व पूजा-अर्चा पुजाऱ्यांकडून केली जाणार असल्याचे विश्वस्त अजित पुजारी व सोमा पुजारी यांनी सांगितले.
देवाचे छायात्रित घरात ठेवूनच पूजन करावे
४ मे रोजी पहाटे ५ वाजता ग्रामदैवत भैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या होणाऱ्या विवाह सोहळ्याप्रसंगी भाविक व ग्रामस्थांनी मंदिर व परिसरात गर्दी न करता आपल्या घरातील देवघरात देवाचा फोटो ठेवून तेथूनच अक्षता सोहळा पार पाडावा. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.