अंकुल चव्हाण खून प्रकरण, फरारी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:21 AM2021-03-19T04:21:08+5:302021-03-19T04:21:08+5:30
बार्शी : बार्शी येथील माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण यांचा मुलगा अंकुल श्रीधर चव्हाण याचा अडीच ...
बार्शी : बार्शी येथील माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण यांचा मुलगा अंकुल श्रीधर चव्हाण याचा अडीच वर्षांपूर्वी खून केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरारी दोघांना पोलिसांनी अटक केली. यातील आरोपी रमेश भगवान माने याला न्यायमूर्ती आर. एस. धडके यांच्यासमोर उभे केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर दुसरा आरोपी नितीन मेहेर याला न्यायालयीन कोठडी दिली आहे.
यातील मयत हा मोक्का कायद्यांतर्गत जामीन मंजूर झाल्यानंतर ही खुनाची घटना २८ ऑक्टोबर २०१८ रोजी उपळाई रोडवरील एका बँकेसमोर घडली होती. याबाबत मयताचे भाऊ आकाश चव्हाण यांनी शहर पोलिसात तक्रार देताच पोलिसांनी १० जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आतापर्यंत आठजणांना अटक केली असून, यातील फरारी आरोपींचा तपास करताना आरोपी रमेश भगवान माने व मेहेर हे करमाळा येथे असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ननवरे, हवालदार रेवनाथ भोंग, ज्ञानेश्वर घोंगडे यांनी करमाळा येथे जात त्यांना अटक केली. दोघांनाही न्यायालयात उभे केले असता, माने याला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली असून, नितीन मेहेर याना न्यायालयीन कोठडी देत त्याला जामिनावर सोडले.