मनोरमा साहित्य पुरस्काराची घोषणा; नऊ साहित्यिकांचा होणार सन्मान
By शीतलकुमार कांबळे | Published: August 1, 2023 02:53 PM2023-08-01T14:53:58+5:302023-08-01T14:54:34+5:30
डॉ. रवींद्र शोभणे यांची प्रमुख उपस्थिती
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या मनोरमा साहित्य पुरस्कार 2023 ची घोषणा करण्यात आली. यंदा नऊ साहित्यिकांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती मनोरमा साहित्य मंडळीचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मनोरमा साहित्य पुरस्काराचे वितरण रविवार 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे होणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ सिने कलावंत अशोक समेळ, तसेच मनोरमा साहित्य मंडळी निवड समितीचे अध्यक्ष डॉ. राजशेखर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या पत्रकार परिषदेत मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे, मनोरमा बँकेचे व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे, मनोरमा साहित्य मंडळाच्या उपाध्यक्षा अस्मिता गायकवाड, पद्माकर कुलकर्णी ऍड. जे.जे. कुलकर्णी, मारुती कटकधोंड, उज्वला साळुंखे आदी उपस्थित होते.
यांना मिळणार पुरस्कार
मनोरमा बँक साहित्य पुरस्कार डॉ. दादा गोरे (औरंगाबाद), डॉ. सोमनाथ कोमरपंत (मडगाव गोवा), डॉ. अनुजा जोशी ( गोवा ) यांना देण्यात येणार आहे. मनोरमा मल्टीस्टेट पुरस्कृत मनोरमा साहित्य पुरस्कार राजन लाखे (पुणे), डॉ. पी. विठ्ठल (नांदेड), डॉ. कविता मुरूमकर (सोलापूर) यांना प्रदान करण्यात येणार आहे. स.रा. मोरे ग्रंथालयातर्फे मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार डॉ. नसीम पठाण (सोलापूर) डॉ. राजेंद्र दास (कुर्डूवाडी), प्रमोद लांडगे (सोलापूर) यांची निवड समितीने एकमताने केली.