चालू खरीप हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 03:23 PM2018-06-11T15:23:00+5:302018-06-11T15:23:00+5:30
नगदी पिकांसाठी विमा हप्ता पाच टक्के : जोखीमस्तर ७० टक्के निश्चित
सोलापूर : खरीप हंगाम २०१८ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर झाली आहे. यात जिल्ह्यातील शेतकºयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले आहे.
शेतकºयांनी भरावयाचा पीक विमा हप्ता खरीप हंगामासाठी प्रति हेक्टरी संरक्षित रकमेच्या दोन टक्के व नगदी पिकासाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जोखीम स्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के निश्चित करण्यात आलेला आहे.
बिगर कर्जदार शेतकºयांचे अर्ज राष्ट्रीयीकृत बँक तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे स्वीकारले जाणार आहेत. यासाठी पेरणी प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील बंधनकारक आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकºयांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांशी संपर्क साधता येणार आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी दिली आहे.
मुदत २४ व ३१ जुलैपर्यंत
- प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकºयांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकºयांना ऐच्छिक स्वरुपाचा आहे. खातेदारांच्याव्यतिरिक्त कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. कर्जदार शेतकºयांनी ३१ जुलै व बिगर कर्जदार शेतकºयांनी २४ जुलैपर्यंत विमा प्रस्ताव बँकेकडे सादर करायचे आहेत.
गैरप्रकार आढळल्यास फौजदारी
- खरीप हंगाम २०१८ पासून ज्या सर्व्हे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आलेला आहे, त्या क्षेत्राच्या सात-बारा उताºयावर शेतकºयाचे नाव नसणे, उताºयावर नोंद क्षेत्रापेक्षा अधिकच्या क्षेत्रासाठी विमा काढणे, बोगस सात-बारा व पीक फेरनोंदीच्या आधारे पीक विम्याची बोगस प्रकरणे करणे, असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर संबंधित दोषींवर फौजदारी दाखल करण्याच्याही सूचना आहेत.