तिकडं पेन्शनसाठी मोर्चात घोषणा, इकडं बाळ अन् चिमुकलीसाठी धावले देवदूत!
By विलास जळकोटकर | Published: March 15, 2023 05:53 PM2023-03-15T17:53:05+5:302023-03-15T17:53:20+5:30
मोलमजुरी करणाऱ्या अजनाळेच्या (कर्नाटक) निशा बिराजदार कुटुंबानं जुळ्यापैकी एक बाळ गेलं आता दुसऱ्याला तरी वाचवा अशी याचना केली.
सोलापूर : ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ असा नारा देत पुनम मेटसमोर आंदोलन सुरु असताना तिकडं मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास सिव्हीलमध्ये तथा शासकीय रुग्णालयात एक दिवसाच्या जन्मलेल्या बाळावर अन् आयुष्याशी झुंज देणाऱ्या आठ वर्षाच्या चिमुकलीला वाचवण्यासाठी डॉक्टर, नर्सिंग स्टूडंट, रोजंदारी कर्मचारी देवदूतासारंख धावून आले.
शासकीय रुग्णालयातील परिचारिकांपासून सर्व स्टॉफ या आंदोलनात सहभागी झाला असल्याने येथील रुग्णांच्या सेवेसाठी एमडी. एम. एस. चे २५०, इंन्टरशिपचे १५०, वरिष्ठ डॉक्टर, नर्सिगं ट्रेनिंगच्या ६० विद्यार्थिनी, रोजंदारीवर काम करणारे १४० कर्मचारी या अपुऱ्या स्टॉफच्या आधारे रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दखल घेण्यात येत असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, उप अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी स्पष्ट केले.
एक बाळ गेलं..दुसऱ्याला तरी वाचवा
मोलमजुरी करणाऱ्या अजनाळेच्या (कर्नाटक) निशा बिराजदार कुटुंबानं जुळ्यापैकी एक बाळ गेलं आता दुसऱ्याला तरी वाचवा अशी याचना केली. डॉक्टरांनी त्यांना धीर दिला. उपचार सुरु केल्यानंतर काही वेळानं बाळ हायपाय हलवू लागल्यानं मातेच्या चेहऱ्यावर हास्य पसरल्याचे त्यांच्या नातलगांनी सांगितले.
... तर खासगी रुग्णालयाकडून मन्युष्यबळ मागवणार
सध्या सुरु असलेलं आंदोलन अधिक काळ चालले तर रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातल्या खासगी रुग्णालयांना पत्र देऊन मन्युष्यबळाची मागणी केली आहे. अत्यावश्यक सेवा खंडित होणार नाही. शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.
यांच्या बळावर रुग्णसेवा
सध्या शासकीय रुग्णालयात एमडी. एम. करणारे २२० विद्यार्थी, इंटरशिप करणारी १५० विद्यार्थी, ४०० वरिष्ठ डॉक्टर असे ४००, नर्सिंग महाविद्यालयातील ६० विद्यार्थिनी, ११२ रोजंदारी काम करणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्या बळावर रुग्णसेवा सुरु आहे.