तंत्रनिकेतन प्रवेशाची पहिली यादी जाहीर
By Admin | Published: July 20, 2014 12:32 AM2014-07-20T00:32:48+5:302014-07-20T00:32:48+5:30
महाविद्यालयांत ७ हजार ६१६ प्रवेश क्षमता : २२ ते २४ दरम्यान पहिली कॅप राऊंड
सोलापूर : १० वीनंतर तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘डायरेक्टरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन’ च्या वतीने शनिवारी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. शहर-जिल्ह्यातील २१ महाविद्यालयांत विविध अभ्यासक्रमांसाठी ७ हजार ६१६ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, दि.२२ ते २४ जुलै दरम्यान पहिली विकल्प फेरी (आॅप्शन राऊंड) होणार आहे.
पहिल्या विकल्प फेरीनंतर दि.२५ जुलै रोजी जागा वाटपाची फेरी होणार आहे. त्यानंतर दि. २६ ते ३0 जुलै दरम्यान पहिल्या कॅप राऊंडमध्ये प्रवेशप्रक्रिया होणार आहे. दि.३१ जुलै रोजी महाविद्यालयनिहाय रिक्त जागेची माहिती जाहीर होणार आहे. दि. १ ते ४ आॅगस्ट दरम्यान दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना विकल्प सादर करता येणार आहे. दि. ५ आॅगस्ट रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, त्यात जागा वाटप होणार आहेत. त्यानंतर दि.६ ते ९ आॅगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया चालणार आहे. दि.११ आॅगस्ट रोजी पुन्हा संस्थानिहाय रिक्त जागेची माहिती जाहीर होणार आहे. दि.१३ आॅगस्ट रोजी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. दि. १३ ते १६ आॅगस्ट दरम्यान प्रवेशप्रक्रिया असणार आहे. सोलापूर शहर- जिल्ह्यात एकूण २१ तंत्रशिक्षण महाविद्यालये आहेत. गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक सोलापूर येथे ६३५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. सोलापूर एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक, सोलापूर-६२१, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक बार्शी, सोलापूर-३१५, शिक्षण प्रसारक मंडळ पॉलिटेक्निक सोलापूर-२२१, विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर-५९३, साई चारिटेबल ट्रस्ट इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ डिप्लोमा इंजिनिअरिंग (पॉली) सासुरे, ता. बार्शी-५९३, श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) गोपाळपूर, पंढरपूर-४४१, शांती एज्युकेशन सोसायटी ए.जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट सोलापूर-३८१, श्रीराम इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी (पॉली) पानीव-४९८, कै.आमदार ब्रह्मदेवदादा माने शिक्षण व सामाजिक प्रतिष्ठान ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निक बेलाटी-३७८, श्री पांडुरंग प्रतिष्ठान कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज शेळवे, ता. पंढरपूर-४४१, सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक सोलापूर-३७८, स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी खेड, सोलापूर-३१८, शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला-३७८, एस.व्ही.सी.एस़ पॉलिटेक्निक कॉलेज अक्कलकोट-२५२, श्रीमान भाऊसाहेब झाडबुके इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक-३७८, न्यू सातारा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट पंढरपूर-३१५, फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅन्ड रिसर्च सांगोला-१२0, भगवंत इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, बार्शी-१२0, सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च अकलूज-१२0, मौलाना आझाद पॉलिटेक्निक, सोलापूर-३१५ अशी प्रवेश क्षमता आहे.
----------------------
पहिली यादी २५ जुलै रोजी
पहिल्या कॅप राऊंडमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील दि.२५ जुलै रोजी जागा वाटप (अलॉटमेंट) होणार आहे. आपल्याला कोणते महाविद्यालय मिळणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
----------------------------
गुणवत्ता यादीनुसार सर्व प्रवेश प्रक्रियाही ‘डायरेक्टरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन’ मार्फत राबवली जाणार आहे. पहिल्या कॅप राऊंडनंतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीनुसार जर कॉलेज मिळाले तर त्यांना त्याच ठिकाणी प्रवेश घ्यावा लागणार आहे.
- अनिल लातूरकर,
प्राचार्य, गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक, सोलापूर.
-------------------
सोलापुरात उपलब्ध असलेल्या शाखा
सोलापूर शहर व जिल्ह्यातील तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, संगणकतंत्र शास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, माहिती तंत्रज्ञान, टेक्सटाईल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इंडस्ट्रीयल इलेक्ट्रा्रॅनिक्स, इन्फरमेशन टेक्नॉलॉजी आदी विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा कल सर्वात जास्त मेकॅनिकल आणि इन्फरमेशन टेक्नॉलॉजीकडे असल्याचे दिसून येते.