शंकरराव मोहिते-पाटील बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:23 AM2021-02-24T04:23:46+5:302021-02-24T04:23:46+5:30

व्यासपीठावर मार्गदर्शिका पद्मजादेवी मोहिते-पाटील, चेअरमन सतीश पालकर, व्हा. चेअरमन विवेक गवळी, महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव मिसाळ, भाऊसाहेब ...

The annual meeting of Shankarrao Mohite-Patil Bank is in full swing | शंकरराव मोहिते-पाटील बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

शंकरराव मोहिते-पाटील बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Next

व्यासपीठावर मार्गदर्शिका पद्मजादेवी मोहिते-पाटील, चेअरमन सतीश पालकर, व्हा. चेअरमन विवेक गवळी, महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव मिसाळ, भाऊसाहेब माने-देशमुख, अण्णासाहेब इनामदार, अण्णासाहेब शिंदे, नाना काळे, शिवाजीराव इंगवले-देशमुख, मारुती खटावकर, जनरल मॅनेजर नितीन उघडे, संचालक सुदर्शन मिसाळ, विजय मगर, विठ्ठल इंगळे, ज्योती कुंभार, रफिक मोहोळकर, सुधीर रास्ते आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात बँकेचे संचालक सुदर्शन मिसाळ यांनी बँकेच्या परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोनामुळे बँकेचे कर्जदार सातत्याने अडचणीत आहेत. भविष्यात या संस्था टिकवून ठेवणे गरजेचे असल्याचे डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. विषय वाचन जनरल मॅनेजर नितीन उघडे यांनी केले.

यावेळी श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रेडिट अँड सॅलरी ओनर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशन यांचीही वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या संस्थांचे अहवाल वाचन फक्रुद्दिन दोहादवाला यांनी केले. तर शंकरराव मोहिते-पाटील उद्योग सहकारी वसाहतीच्या सभेचे अहवाल वाचन रामदास रणनवरे यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजीराव इंगवले-देशमुख यांनी केले. व्हा चेअरमन विवेक गवळी यांनी आभार मानले.

फोटो ओळी :::::::::::::::::::::::

शंकरराव मोहिते-पाटील बँकेच्या वार्षिक सभेत बोलताना डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील. व्यासपीठावर पद्मजादेवी मोहिते-पाटील, माणिकराव मिसाळ, भाऊसाहेब माने-देशमुख, अण्णासाहेब इनामदार, अण्णासाहेब शिंदे आदी.

Web Title: The annual meeting of Shankarrao Mohite-Patil Bank is in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.