पंढरपूर तालुक्यातील करकंबमध्ये आणखी एक जण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 10:00 AM2020-06-01T10:00:26+5:302020-06-01T10:00:31+5:30

प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती; संपर्कातील लोकांना तपासणीसाठी घेतले ताब्यात

Another corona positive in Karkamba in Pandharpur taluka | पंढरपूर तालुक्यातील करकंबमध्ये आणखी एक जण कोरोना पॉझिटिव्ह

पंढरपूर तालुक्यातील करकंबमध्ये आणखी एक जण कोरोना पॉझिटिव्ह

googlenewsNext

पंढरपूर : करकंब (ता. पंढरपूर) येथे आणखी एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामुळे करकंबमध्ये दोन कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

करकंब येथे काहीजण पुणे येथून आले होते. करकंब (ता. पंढरपूर) येथे पुणेवरून आलेल्या एकाला २७ मे रोजी कोरोना संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्या ३९ कॉरंटाईन करण्यात आले होते. त्या लोकांची कोरोनाची चाचणी करण्यासाठी स्वॅब घेण्यात आले होते. त्या ३९ लोकांपैकी ३८ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह तर १ जण पॉझिटिव्ह माहिती प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

Web Title: Another corona positive in Karkamba in Pandharpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.