सोलापूरातील अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 11:16 AM2018-07-07T11:16:56+5:302018-07-07T11:18:50+5:30
प्रवेश प्रक्रिया: ए. डी. जोशी ९०.६० टक्के, वालचंद ८७़८०,संगमेश्वर ८४.६० टक्के
सोलापूर: इयत्ता ११ वीच्या प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली़ शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता यादी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी झाली होती़ जाहीर झालेल्या दुसºया गुणवत्ता यादीमध्ये विज्ञान शाखेसाठी ए. डी. जोशी कॉलेजचे हाय मेरीट ९०.६० टक्क्यांवर पोहोचले.
या पाठोपाठ वालचंद महाविद्यालय ८७़८०, भारती विद्यापीठ ८५़२० टक्के, संगमेश्वर महाविद्यालय ८४़६० टक्के, दयानंद कॉलेज ७८़८० टक्के तर हरिभाई देवकरण ८०़८० टक्के, असा खुल्या प्रवर्गासाठी कट आॅफ लागला. जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेळापत्रकाप्रमाणे दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याने कट आॅफ पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी विविध महाविद्यालयांमध्ये गर्दी केली होती. वाणिज्य शाखेसाठी हिराचंद नेमचंद कॉलेज ८१.६० टक्के, संगमेश्वर कॉलेज ७१़८० टक्के, हरिभाई देवकरण ७०़२० टक्के, वेलणकर कॉलेज ६९ टक्के असा खुल्या प्रवर्गाचा कट आॅफ लागला आहे.
कला शाखेचीही गुणवत्ता यादी जाहीर झाली. या शाखेत बहुतांशी इच्छुक सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याचे यादीवरून दिसून येत आहे. पहिल्या गुणवत्ता यादीनुसार ज्यांना कट आॅफपेक्षा जास्त गुण आहेत त्यांना इयत्ता अकरावीसाठी संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश देण्यास सोमवारपासून लागलीच प्रारंभ झाला. आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच लगबग दिसून आली.
विद्यार्थी-पालक आणि महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी, या अनुषंगाने जि. प. च्या माध्यमिक शिक्षण विभागाने वेळापत्रक आखले आहे़ त्यानुसार १२ ते २३ जून या कालावधीत महाविद्यालयीन स्तरावर फॉर्मचे वाटप करण्यात आले. २३ ते २६ जून या कालावधीत फॉर्म वाटप आणि भरलेले फॉर्म संबंधित महाविद्यालयाकडे सादर करण्यात आल्यानंतर २९ जून ते १ जुलै महाविद्यालयीन स्तरावर अर्जांची छाननी होऊन २ जुलै रोजी विविध महाविद्यालयांनी पहिली गुणवत्ता यादी लावली.
विज्ञान शाखा कट आॅफ
- ए. डी. जोशी ज्युनिअर कॉलेज (एकूण ८९ जागा) :- खुला ९०.६०, ओबीसी ८५़८०, एसबीसी ८९़६०, एऩटी़डी़ ८४़४०, एऩटी़सी़ ८९़८०, एनटीबी ७६, व्ही़जे़८२, एस़सी़८२़४०
- वालचंद कॉलेज- (एकूण ११ जागा) : खुला ८७़८०, एसबीसी ८६़८०, एससी ८२, व्हीजेए ८५, एनटीबी ८३, एनटीसी ८५, एनटीडी ६९़४०,
- संगमेश्वर कॉलेज :- खुला ८४़६०, ओबीसी ८२़२०, एसबीसी ८४, एससी ८१, व्हीजेए ८३, एनटीबी ८०, एनटीसी ८३़६०, एनटीडी ५३़६० व मायनॉरिटी ८१़४० टक्के.
- दयानंद कॉलेज :- खुला ७८़८०, ओबीसी ६८, एसबीसी ८२़४०, एससी ५६़४०, व्हीजेए ७८.६०, एनटीबी ७५.६०, एनटीसी ७५.८०़
- हरिभाई देवकरण - (एकूण ९३ जागा):- खुला ८०़८०, ओबीसी ७४़४०, एसबीसी ७७़४०, एससी ७७.२०, एनटीबी ७९, एनटीसी ७८.६०
- भारती विद्यापीठ - (एकूण ४१ जागा):- खुला ८५़२०, ओबीसी ८२़६०, एससी ८४़४०, व्ही़जे़ ८४़४०, एनटीबी ८१़२०, एनटीसी ८४़४०, एनटीडी ८४़४०
वाणिज्य शाखा कट आॅफ
- हिराचंद नेमचंद कॉलेज : (अनुदानित तुकडी ) :- खुला ८१.६०, ओबीसी ८१़२०, एसबीसी ८१़२०, एससी ६९़८०, व्ही.जे. ७६़६०, एनटीबी ७५़६०, एनटीसी ७७़८०,
- (विनाअनुदानित तुकडी) :- खुला ८२, ओबीसी ७१.८०, एसबीसी ८०, एससी ४५़६०, व्ही.जे. ६०, एनटीबी ५०़२०, एनटीसी ६२
- हरिभाई देवकरण :- खुला ७०़२०, ओबीसी ६४, एसबीसी ६८़२०, एससी ६७़४०,व्ही.जे. ६४़८०, एनटीबी ६३़४०, एनटीसी ६६,
- वेलणकर कॉलेज : खुला ६९, ओबीसी ६१.८०, एसबीसी ५४़८०, एससी ४०, एनटीबी/एनटीसी/एनटीडी / व्हीजेए ४४़२० टक्के.
- भारती विद्यापीठ : खुला ७८़२०, ओबीसी ६९़४०, एससी ७५़८०,व्ही़जे़७४़४०,एनटीसी ७८