मृग नक्षत्र बरसेना...

By Admin | Published: June 12, 2014 01:02 AM2014-06-12T01:02:57+5:302014-06-12T01:02:57+5:30

काही भागात पाऊस: मागील वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी

Antelope constellation Barcaena ... | मृग नक्षत्र बरसेना...

मृग नक्षत्र बरसेना...

googlenewsNext


सोलापूर: रोहिणी नक्षत्राचा काही भागात पाऊस पडला परंतु मृग नक्षत्राचे चार दिवस कोरडेच गेले आहेत. आजअखेरला मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमीच झाला आहे.
मागील वर्षी मे अखेरलाच काही तालुक्यात पाऊस पडला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला होता. दररोज पाऊस अन् दररोजच ढगाळी वातावरणामुळे मागील वर्षीचा जून महिनाही शेतकऱ्यांसाठी चांगला गेला होता. यावर्षी मात्र आजपर्यंत म्हणावा तसा पाऊस झाला नाही. रोहिणी नक्षत्रामध्ये काही करमाळा, सांगोला, पंढरपूर, माढा, माळशिरस, मोहोळ, मंगळवेढा, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट या तालुक्यात पाऊस पडल्याची नोंद आहे. ८ जून रोजी मृग नक्षत्र निघाल्यानंतर जिल्ह्यात पाऊस झाला नाही. मृग नक्षत्राचा पाऊस चांगला झाला तरच खरीप पेरणी होणार आहे.
यावर्षी आजअखेर पडलेला पाऊस ० उत्तर सोलापूर-१४.२८ मि.मी., दक्षिण सोलापूर- १०.९४ मि.मी., बार्शी-३२.१९ मि.मी., अक्कलकोट-८.३१ मि.मी., पंढरपूर-१५.७६ मि.मी., मंगळवेढा-२५.६१ मि.मी., सांगोला-७०.४९ मि.मी., माढा-१६.६३ मि.मी., मोहोळ-१५.८३ मि.मी., करमाळा-५८.८३ मि.मी., माळशिरस-२४.५१ मि.मी. एकूण-२९३.३८ मि.मी.सरासरी- २६.६७ मि.मी. ० मागील वर्षीचा आजअखेरचा पाऊस उत्तर सोलापूर-४९.१० मि.मी., दक्षिण सोलापूर- ४९.१० मि.मी., बार्शी-२७.०० मि.मी., अक्कलकोट-४५.०० मि.मी., पंढरपूर-५८.७३ मि.मी., मंगळवेढा-३९.१३ मि.मी., सांगोला-५१.६० मि.मी., माढा-४५.६० मि.मी., मोहोळ-५३.४० मि.मी., करमाळा-४६.०० मि.मी., माळशिरस-८१.०० मि.मी. एकूण-५८५.६६ मि.मी.सरासरी- ५३.२४ मि.मी.

Web Title: Antelope constellation Barcaena ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.