प्रतिक हत्याकांड ; गळा कापलेल्या चाकूवर आढळले पाच जणांचे ठसे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 02:22 PM2018-11-06T14:22:33+5:302018-11-06T14:28:20+5:30
पाच जणांचा खुनात समावेश : जुन्या वाड्यातील खड्ड्यात पोलिसांना सापडले शस्त्र
मंगळवेढा : प्रतीकचे हत्याकांड हा नरबळीचा प्रकार असल्याने पोलीस प्रशासन तपासकामी सावधपणे पाऊले उचलत आहे. तपासाची गती पाहता हे हत्याकांडाचे गूढ आज, उद्या उकलण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. या हत्याकांडात गळा कापण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू पोलिसांच्या हाती लागला असून, त्या चाकूवर पाच जणांचे ठसे निदर्शनास आले आहेत. त्यावर असणाºया ठशाची पडताळणी करण्यात पोलिसांना बºयापैकी यश आले आहे.
मारेकºयांनी हा चाकू दुसºयाकडून मागून आणला असून त्यावर देणाºयाचेही ठसे आढळले आहेत. या नरबळीमध्ये पाच ते सात जणांचा सहभाग असल्याचे तपासाअंती पुढे येत असून गळा चिरताना आरडाओरडा करू नये, यासाठी प्रतीकच्या तोंडात बोळा घातला असल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे. गावातीलच एका जुन्या वाड्यात पोलिसांनी तपासणी केली असता, त्यांना घराच्या एका बाजूस खड्डा खोदून तो बुजविला असल्याचे दिसून आले.
बुजविल्याची बाजू दिसू नये, यासाठी शेणाने सारवण्यात आल्याचेही आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केल्याने बºयापैकी माहिती मिळाली आहे. प्रतीकचा नरबळी हा मंगळवारच्या दरम्यान दिला असण्याची शक्यता आहे. त्याला तीन दिवस खुन्यांनी दुसरीकडे ठेवून मंगळवारी त्या उसात हत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. प्रतीक शिवशरण या चिमुरड्याची हत्या झाल्यानंतर बालकांसह पालकांपर्यंत सगळ््यांनी धास्ती घेतली असून, पोलीस आपल्या पद्धतीने तपास करीत असले तरी पालकांतून याचा लवकरात लवकर छडा लागण्याची मागणी जोर धरत आहे.
गळा चिरताना पाच फूट रक्त उडाले
प्रतीकचा गळा चिरताना बाहेर आलेले रक्त पाच फुटापर्यंत उसाच्या पालावर उडाले असून, तो रक्ताळलेला पाला पोलिसांनी जप्त केला आहे. डावा पाय कापून काढताना मात्र मोठ्या धारधार शस्त्राचा वापर केला असल्याची शंका आहे. ते शस्त्र मात्र अद्याप मिळाले नाही व तो पायही मिळाला नाही.
अनेकांच्या उरात धडकी
- पोलीस अधीक्षक मनोज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी चार दिवस तपासाची चक्रे फिरवल्याने बºयापैकी हत्याकांडाचा उलगडा होण्यास मदत मिळाली आहे. कोणी निरपराध अडकू नये, त्याला त्रास होऊ नये, याची दक्षता घेतली आहे. पोलिसांच्या चौकशीसत्राने अनेकांच्या उरात धडकी भरली आहे.
तांत्रिक बाबींचा वापर
- पोलिसांनी तपासकामी सर्व तांत्रिक बाबीचा आधार घेत योग्य दिशेने तपास सुरू ठेवला आहे. घटनेच्या दरम्यान ज्या ज्या व्यक्तीचे मोबाईल नंबर टॉवरवर आले आहेत, त्यांची सखोल चौकशी सुरू केली आहे.