रेल्वे प्रवाशांची कोणतीही तक्रार आता ‘रेल मदत अ‍ॅप’वर...

By Appasaheb.patil | Published: December 19, 2018 12:56 PM2018-12-19T12:56:29+5:302018-12-19T14:45:13+5:30

प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या प्रत्येक तक्रारीचे निराकरण त्वरित करण्यासाठी भारतीय रेल्वे विभागाने ‘रेल मदत अ‍ॅप’ सुरू केले करण्यात आल्याची माहिती सोलापूर मंडलाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हितेंन्द्र मल्होत्रा यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधताना दिली.

Any complaints of train passengers now on the 'Rail Help App' ..: Hitendra Malhotra | रेल्वे प्रवाशांची कोणतीही तक्रार आता ‘रेल मदत अ‍ॅप’वर...

रेल्वे प्रवाशांची कोणतीही तक्रार आता ‘रेल मदत अ‍ॅप’वर...

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्येक प्रवाशाला कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नोंदवण्याची मुभाआपण कोठेही असाल तर आपल्याला समस्येचे निराकरण मिळेलट्रेनमध्ये प्रवास करताना ट्रेनच्या विलंबवर क्लिक करून आपण कोणत्याही प्रकारची मदत व तक्रार घेऊ शकता

सोलापूर : प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या प्रत्येक तक्रारीचे निराकरण त्वरित करण्यासाठी भारतीय रेल्वे विभागाने ‘रेल मदत अ‍ॅप’ सुरू केले करण्यात आल्याची माहिती सोलापूर मंडलाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हितेंन्द्र मल्होत्रा यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधताना दिली. या अ‍ॅपबाबत मल्होत्रा यांच्याशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे :

प्रश्न : रेल मदत अ‍ॅप काय व कसे आहे ? प्रवाशांनी ते कसे वापरले पाहिजे ?
उत्तर : या अ‍ॅपद्वारे, रेल्वेने प्रवास करणा-या प्रत्येक प्रवाशाला कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नोंदवण्याची मुभा देण्यात आली आहे. यात प्रथमत: मोबाईल वापरकर्त्याने प्ले स्टोअरमधून अ‍ॅप डाउनलोड करून घ्यावयाचे आहे. हे अ‍ॅप उघडताच प्रवाशाने त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर भरल्यानंतर ओटीपी क्रमांक येईल. त्यानंतर आपले खाते लॉग इन होईल. तक्रार करताना प्रारंभी प्रवाशांनी पीएनआर क्रमांक प्रविष्ट करावा. त्यानंतर स्क्रीनवरील तक्रारीची यादी दिसेल. आपली तक्रार ज्या प्रकारात मोडेल तेथे तक्रार नोंद करावी. पॅसेजर फोटो देखील संलग्न केले जाणार आहे़ आपण कोठेही असाल तर आपल्याला समस्येचे निराकरण मिळेल. फक्त एवढेच नाही की, ट्रेनमध्ये प्रवास करताना ट्रेनच्या विलंबवर क्लिक करून आपण कोणत्याही प्रकारची मदत व तक्रार घेऊ शकता.

प्रश्न : या रेल मदत अ‍ॅपचा फायदा काय ?
उत्तर : या अ‍ॅपच्या मदतीने देशात कोणत्याही ठिकाणी रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशाला तक्रार करता येणार आहे. यामध्ये प्रवासी कोणत्याही प्रकारच्या तक्रारी करू शकेल. शिवाय गाडीतील पॅन्ट्रीबद्दल माहिती मिळविणेही या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशाला सहज मदत होणार आहे.

प्रश्न : कशा पध्दतीने होणार प्रवाशांच्या तक्रारीचे निराकारण ?
उत्तर : आतापर्यंत प्रवाशांना आॅनलाईन खानपान आणि ट्रेनशी संबंधित माहितीची तक्रार करता येत होती.  एकापेक्षा अधिक आणि रेल्वेच्या इतर विभागाशी संबंधित असल्यास, दुस-या क्रमांकावर ते कॉल करण्यास भाग पाडले जात होते, परंतु ‘रेल मदत’ अ‍ॅपवर फक्त एका क्लिकमध्ये, रेल्वे प्रवाशांच्या प्रत्येक तक्रारीची नोंदणी करून त्याचे त्वरित निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

प्रश्न : आपल्या तक्रारीची सोडवणूक कधी होईल हे प्रवाशाला कसे कळेल ? 
उत्तर : रेल्वे मंत्रालय प्रवाशांना मोठे डिजिटल प्लॅटफॉर्म पुरवत आहे. ज्यावरून ते रेल्वे स्टेशनवरील अधिकारी, कामगार व इतर सेवासुविधांबाबत तक्रार करु शकतात. ही तक्रार थेट रेल्वे मंत्रालयात पोहोचेल, त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिका-यांकडेही तक्रारी पोहोचणार आहेत. दरम्यान, काही वेळातच या तक्रारीची दखल घेऊन ही तक्रार सोडविण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रत्येक अपडेटची माहिती तक्रारदारास एसएमएसद्वारे देण्यात येणार आहे त्यामुळे आपल्या तक्रारीचे काय झाले याबाबतच्या शंकेचे समाधान होणार आहे.

प्रश्न : अ‍ॅपबाबत प्रवाशांना काय आवाहन कराल ?
उत्तर : रेल्वे मदत अ‍ॅपद्वारे प्रवाशांना तक्रार करण्याचे मोठे व्यासपीठ आहे़ या अ‍ॅपचा फायदा घेऊन सोलापूर मंडलातील प्रवाशांनी कसल्याही प्रकारची तक्रार, सूचना  प्रवासाअगोदर किंवा प्रवासादरम्यान असल्यास रेल मदत अ‍ॅपचा उपयोग करून आपली तक्रार नोंदवावी व आपला रेल्वे प्रवास सुखद करावा असेही आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांनी केले आहे.

Web Title: Any complaints of train passengers now on the 'Rail Help App' ..: Hitendra Malhotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.