आरटीईअंतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:49 AM2021-02-05T06:49:23+5:302021-02-05T06:49:23+5:30
खासगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यीत शाळांमध्ये इयत्ता पहिलीतील आर्थिक दुर्बल व वंचित घटक, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या जमाती, विशेष ...
खासगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यीत शाळांमध्ये इयत्ता पहिलीतील आर्थिक दुर्बल व वंचित घटक, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, एसईबीसी, अपंग, विधवा व घटस्फोटित पालकांचे पाल्य आदी प्रवर्गांतील एकूण पटाच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे.
त्या दृष्टीने येणाऱ्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाची प्रक्रिया चालू झाली आहे. शाळांनी ८ फेब्रुवारीपर्यंत शिक्षण विभागाकडे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर नोंदणी झालेल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी २६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावयाचे आहेत. ५ मार्च रोजी सोडत काढून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. यावर्षी एकदाच सोडत काढली जाणार असल्याने संबंधित शाळा आणि पालकांनी वेळेत कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन महारुद्र नाळे यांनी केले आहे.