शेततळ्यासाठी अर्जांचा लागला ढिगारा
By admin | Published: April 3, 2016 11:50 AM2016-04-03T11:50:40+5:302016-04-03T11:50:40+5:30
'मागेल त्याला शेततळे' योजनेसाठी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी २५ दिवस शिल्लक असताना तब्बल १५ हजार २८१ अर्ज दाखल झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ३ - 'मागेल त्याला शेततळे' योजनेसाठी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी २५ दिवस शिल्लक असताना तब्बल १५ हजार २८१ अर्ज दाखल झाले आहेत. सोलापूर जिल्ह्याला १९१६ शेततळ्याचे उद्दिष्ट आले असून शेतकर्यांकडून आलेल्या अर्जांच्या ढिगार्याचे काय करायचे?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे देण्याची घोषणा केली आहे. शेतकर्यांना अर्ज दाखल करण्यासाठी ४५ दिवसांचा अवधी दिला आहे. त्याची मुदत १३ एप्रिलपर्यंत आहेत. २१ मार्चपर्यंत ऑनलाईन १५ हजार २८१ शेतकर्यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
अर्ज दाखल करण्यासाठीच्या पहिल्या २0 दिवसांत आलेल्या अर्जांची ही संख्या असून उर्वरित २५ दिवसांत येणार्या अर्जांची संख्या वेगळी असणार आहे. अगोदरच दुष्काळ असल्याने शेतकर्यांची मानसिकताच शेतात प्रयोग करण्याची राहिली नाही. अशात शासन शेतकर्यांना अडचणीत आणत आहे. खर्च अधिक, अनुदान कमी र८ेु'>च्/र८ेु'>३0 मीटर लांबी, ३0 मीटर रुंदी व ३ मीटर खोलीचे शेततळे खोदणार्या शेतकर्याला ५0 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. एवढे मोठे शेततळे खोदण्यासाठी किमान सव्वा लाख रुपये खर्च येईल, असे कृषी खात्याच्या जाणकारांचे मत आहे. शिवाय अनुदानाची ५0 हजारांची रक्कम मिळण्यासाठी कागदपत्रांचा खर्च, हेलपाटे व चिरीमिरी द्यावी लागणार आहे.
मागेल त्याला शेततळे' योजनेच्या ५0 हजार रुपयांच्या अनुदानात शेततळ्याचे काम होत नाही. त्यामुळे शेतकरी शेततळी करू शकत नाहीत.
-प्रभाकर देशमुख,
जनहित शेतकरी संघटना १९१६ हे उद्दिष्ट शासनाने दिले असून ही कामे सुरू झाल्यानंतर उद्दिष्ट वाढवून मिळणार आहे. प्रथम आलेल्या अर्जदाराला मंजुरी देताना प्राधान्य दिले जाणार आहे.
- बसवराज बिराजदार,