'आर्थिक निकषावर आरक्षण लागू करा, अन्यथा सर्वांचे रद्द करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 06:31 AM2019-06-15T06:31:38+5:302019-06-15T06:32:50+5:30

उदयनराजे भोसले : आरक्षणाने लोकशाही संकटात

'Apply reservation on financial criteria, otherwise cancel all' | 'आर्थिक निकषावर आरक्षण लागू करा, अन्यथा सर्वांचे रद्द करा'

'आर्थिक निकषावर आरक्षण लागू करा, अन्यथा सर्वांचे रद्द करा'

Next

सोलापूर: धनगर, लिंंगायत, मराठा, मुस्लिम समाजातील नागरिकांना आरक्षण लागू करा. अन्यथा सर्वांचे आरक्षण रद्द करा. आरक्षणामुळे जाती-धर्मात भांडणे लागली आहेत. त्यामुळे प्रत्येक धर्मातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तींना आरक्षण लागू करा, अशी मागणी छत्रपती शिवरायांचे वंशज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सोलापुरात केली.

येथील सिध्देश्वर मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे म्हणाले, आरक्षणामुळे लोकशाही संपुष्टात येत आहे. सगळे आरक्षण रद्द करुन टाका. उगाच शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सर्वधर्म समभावाची शिकवण देऊ नका. लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर ईव्हीएम तोडा आणि माणसे जोडा, असे आवाहन उदयनराजे यांनी केले. उदयनराजे म्हणाले, माझे ठाम मत आहे की निवडून येणं महत्वाच नाही. मी यापूर्वी पराभव पचवला आहे. पण यावेळी माझ्या मताधिक्यात दोन-सव्वा दोन लाखांनी घट झाली आहे. सोलापुरातही ज्यांच्या जाहीर सभांना गर्दी झाली ते उमेदवार पराभूत झाले.

Web Title: 'Apply reservation on financial criteria, otherwise cancel all'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.