विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी पुरातन विभागातील आर्किटेक्चरची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 11:08 AM2018-12-31T11:08:04+5:302018-12-31T11:09:49+5:30
पंढरपूर : पंढरपुरातील प्राचीन मंदिर असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी पुरातन विभागातील आर्किटेक्चर नियुक्ती करण्यात आली आहे. येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी ...
पंढरपूर : पंढरपुरातील प्राचीन मंदिर असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी पुरातन विभागातील आर्किटेक्चर नियुक्ती करण्यात आली आहे.
येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे प्राचीन आहे़ यामुळे मंदिरात काही बदल करायचे असतील तर पुरातत्व विभागाच्या सूचनेने बदल करावे लागतात. यासाठी अनेक वर्षाचा महिन्याचा कालावधी जातो.
मंदिरातील गरजेनुसार काही बदल तत्काळ करावे लागतात़ त्यासाठी तत्काळ अधिकारी उपलब्ध व्हावा. यासाठी शासनाने पुरातन विभागातील आर्किटेक्चर प्रदीप देशपांडे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मंदिरातील काही बदल करावयाचे झाल्यास ते आता शक्य होणार आहे़ परिणामी आता मंदिराला पुरातन लुक येणार आहे़