माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी मारुती फडके यांची नियुक्ती
By शीतलकुमार कांबळे | Published: August 1, 2023 03:47 PM2023-08-01T15:47:00+5:302023-08-01T15:47:09+5:30
मारुती फडके उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभाग लातूर येथे सहसचिव म्हणून कार्यरत होते.
सोलापूर - माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी मारुती फडके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र मंगळवार १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव विजय भोसले यांनी काढले आहे.
मारुती फडके उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभाग लातूर येथे सहसचिव म्हणून कार्यरत होते. तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे बदली झाली. तेव्हापासून माध्यमिक शिक्षणाधिकारी हे पद रिक्त होते. बाबर यांच्या बदलीनंतर माध्यमिक शिक्षण विभागाचा प्रभारी पदभार योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांच्याकडे देण्यात आले होते.
त्यानंतर तत्कालीन महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांच्याकडे माध्यमिक शिक्षणाधिकारीचा प्रभारी कारभार सोपवला होता. जावेद शेख यांची लातूर येथे बदली झाल्यानंतर तात्पुरता पदभार नव्यानेच रुजू झालेले उपशिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला होता. आता सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाला कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी मिळाला आहे.