सहा लेखापरीक्षण पथकांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:23 AM2021-05-06T04:23:08+5:302021-05-06T04:23:08+5:30
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. तालुक्यात १४ खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. खासगी ...
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. तालुक्यात १४ खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांचे शासन निर्णयानुसार लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयातील बिलांची तपासणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून लेखापरीक्षणासाठी ६ पथकांची नेमणूक केली आहे. या पथकामार्फत खासगी रुग्णालयांच्या रँडम बेसवर तसेच प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने लेखापरीक्षण करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
कोरोनावर १४ खासगी रुग्णालयात उपचार
पंढरपूर शहरामधील गॅलक्सी, लाईफलाईन, श्री गणपती, जनकल्याण, ॲपेक्स, श्री विठ्ठल, पावले, वरदविनायक, मेडीसिटी, ऑक्सिजन पोलीस, पडळकर, विठ्ठल, डिव्हीपी तसेच करकंब येथील जगताप हॉस्पिटल या १४ खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या संबंधित हॉस्पिटलबाबत ज्या कोणाला बिलांबाबत शाशंकता असेल त्यांनी बिल अदा करण्यापूर्वी प्रांत कार्यालय पंढरपूर येथील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. बिलांबाबत लिखित स्वरुपात तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहनही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.