ए.पी.एल.शिधापत्रिकेसाठी ३० लाख मेट्रिक टन तांदूळ मे महिन्यासाठी दिली मंजुरी; गहू मात्र अद्याप मंजूर नाही

By admin | Published: May 6, 2014 08:12 PM2014-05-06T20:12:51+5:302014-05-07T00:33:09+5:30

सोलापूर:

Approval for 3 million metric tonnes of rice for the month of April for APL cardiac cremation; Wheat is not yet approved | ए.पी.एल.शिधापत्रिकेसाठी ३० लाख मेट्रिक टन तांदूळ मे महिन्यासाठी दिली मंजुरी; गहू मात्र अद्याप मंजूर नाही

ए.पी.एल.शिधापत्रिकेसाठी ३० लाख मेट्रिक टन तांदूळ मे महिन्यासाठी दिली मंजुरी; गहू मात्र अद्याप मंजूर नाही

Next

सोलापूर:
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या ए.पी.एल.(केसरी) कार्डधारकांनाही मे महिन्याचे धान्य देण्यात येणार असून, राज्यातील ५५ लाख ४५ हजार २९८ कार्डधारकांसाठी २९,९०० लाख मेट्रिक टन तांदूळ मंजूर झाला आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची राज्यात फेब्रुवारीमध्ये अंमलबजावणी झाली. ए.पी.एल.मधील कमी उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागात ७५ टक्के व शहरात ५५ टक्के कार्डधारकांची नावे अन्नसुरक्षा योजनेसाठी घेण्यात आली आहेत. अशा कार्डधारकांना तांदूळ ३ रुपये व गहू २ रुपये दराने दिला जात आहे. रेशन कार्डवर असलेल्या प्रतिव्यक्ती पाच किलोप्रमाणे धान्य दिले जात आहे. अन्नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या ए.पी.एल. कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार होती. शासनाने दखल घेत मे महिन्याचा तांदूळ मंजूर केला आहे. राज्यातील ३४ जिल्‘ांसाठी हा तांदूळ दिला जाणार असून गहू मात्र मंजूर झालेला नाही.
चौकट
० प्रति कार्ड ५ किलो तांदूळ व १० किलो गहू
० तांदूळ प्रति किलो ९ रुपये ६० पैसे, गहू प्रति किलो ७ रुपये २० पैसे
० ए.पी.एल. प्रति कार्ड १५ किलो धान्य देणार
चौकट
कार्डधारक व कंसात तांदूळ(मे.टन.मध्ये)
ठाणे-१,३३,२४९(९३३), रायगड-१,६३,२६४(११४३), रत्नागिरी- ८५,५०७( ५९९), सिंधुदूर्ग-३५,७८४(२५०), नाशिक-१,७९,०६०(८९५), धुळे-१,०८,१०२(५४१), नंदूरबार-८४,०६७(५८८), जळगाव-२,४७,०६३(१२३५), अहमदनगर- १,०१,७८४(५०९), पुणे-६,५४,६०५(३२७२), सांगली- ७९,२३५(३९६), सातारा-१,२९,८९९(६४८), सोलापूर- २,२७, ५३७(११३७), कोल्हापूर- १,५५,४७७(७७६), औरंगाबाद-३,१०,३४६(१५५३), नांदेड-१,३२,०३४(६५९), हिंगोली-७६,७७५(३८३), लातूर-७९,२९४(३९५), जालना-३७,४२४(१८६), उस्मानाबाद-४,४६,८८६(५८३), बीड-१,२३,६७७(६१७), परभणी-१,१५,५८९(५७७), अमरावती-१,४६,७९३(५७७), अकोला-७३,२५३(३६५), वाशिम-६४,४७१(३२१), यवतमाळ-२८,३३८(१४१), बुलढाणा-८६,४९०(४३१), नागपूर-३,५५,५१३(१७७७), वर्धा-६०,५३४(३०२), भंडारा-५४,५००(२७२), गोंदिया-६८,०११(३४०), चंद्रपूर- ४०,९७७(२०५), गडचिरोली-२४४१(१७) एकूण ५५ लाख ४५ हजार २९८(२९,९००)

Web Title: Approval for 3 million metric tonnes of rice for the month of April for APL cardiac cremation; Wheat is not yet approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.