शहराची हद्दवाढ करण्यासह ५५ विषयांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:55 AM2021-01-13T04:55:42+5:302021-01-13T04:55:42+5:30
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष समीर मुलाणी हे होते. सर्वसाधारण सभेत शासकीय योजनेतील नगरपरिषद फंडातून येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी ...
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष समीर मुलाणी हे होते.
सर्वसाधारण सभेत शासकीय योजनेतील नगरपरिषद फंडातून येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्तीत अभ्यासिकेमध्ये लाईट फिटिंग, फर्निचर व विद्युतीकरण करणे, दिव्यांग व्यक्तींसाठी राखून ठेवलेला पाच टक्के निधी खर्च करण्याची अंमलबजावणी करणे, गवळी मळा ते लेंगरे वस्ती रस्ता खडीकरण व मुरुमीकरण करणे, जुना बारलोणी रस्ता ते खरात वस्ती रस्ता गट नं. ९३ मधून मजबुतीकरण काँक्रिटीकरण करणे, तसेच करमाळा रोड ते बालाजीनगर ते बार्शी रोड क्राॅस करून गटार काँक्रिटीकरण करून ती गटार कॅनाल गटारीला जोडणे, शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांचे रिपेअरिंग करणे, आदी ५५ विषयांना या सभेत मंजुरी देण्यात आली आहे.
या व्हिडीओ काॅन्फरन्सिंग सभेला नगरसेविका जनाबाई चौधरी, राधिका धायगुडे, अनिता साळवे, वनिता सातव, शहनाज मुलाणी, अरुण काकडे, बबन बागल, आयुब मुलाणी, नंदा वाघमारे, मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्यासह सर्व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.