भोसे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:26 AM2021-08-14T04:26:51+5:302021-08-14T04:26:51+5:30
भोसे जिल्हा परिषद गटामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने परिसरातील ग्रामस्थांना प्राथमिक उपचारासाठी करकंब, रोपळे किंवा पंढरपूर येथे जावे लागते. ...
भोसे जिल्हा परिषद गटामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने परिसरातील ग्रामस्थांना प्राथमिक उपचारासाठी करकंब, रोपळे किंवा पंढरपूर येथे जावे लागते. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र नसलेला भोसे हा एकमेव जिल्हा परिषद गट आहे. यामुळे भोसे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळावी, यासाठी अतुल खरात यांनी राजेश टोपे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी, सुजित गायकवाड, धनंजय तळेकर आदी उपस्थित होते.
फोयो :::::::::::::::::::::
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देताना झेडपी सदस्य अतुल खरात.