अरण येथे पार पडल्या धनुर्विद्या स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:24 AM2021-09-21T04:24:20+5:302021-09-21T04:24:20+5:30

स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार डॉ. दत्तात्रय मोहाळे यांनी केले. यावेळी जि.प. सदस्य संघटनेचे उपाध्यक्ष भारत शिंदे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे व ...

Archery competitions held at Aran | अरण येथे पार पडल्या धनुर्विद्या स्पर्धा

अरण येथे पार पडल्या धनुर्विद्या स्पर्धा

googlenewsNext

स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार डॉ. दत्तात्रय मोहाळे यांनी केले. यावेळी जि.प. सदस्य संघटनेचे उपाध्यक्ष भारत शिंदे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे व सोलापूर धनुर्विद्या संघटनेचे सचिव हरिदास रणदिवे, फौजदार अनुराधा पाटील, उत्तमराव पाटील उपस्थित होते. यावेळी राज्य धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील प्रशिक्षक व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या चाचणी स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ६० धनुर्धर सहभागी झाले होते.

या स्पर्धेत सीनियर इंडियन प्रकारात उमाकांत भोसले प्रथम, दिगंबर चव्हाण द्वितीय, आकाश ताकतोडे तृतीय, पायल गाजरे प्रथम, समृद्धी पवार द्वितीय, अर्पिता सावंत तृतीय, सीनियर रिकर्व्ह प्रकारात शिवम चिखले प्रथम, आदित्य भंडारे द्वितीय, रणजीत वसेकर तृतीय, श्रेया परदेशी प्रथम, सृष्टी शेंडगे द्वितीय, प्रगती शिंदे. कंपाउंड राउंडमध्ये सुधाकर पळसे प्रथम, भांगे प्रसाद प्रसाद भांगे द्वितीय, निखिल वसेकर तृतीय, तनिष्का ठोकळ प्रथम, स्मृती विरपे द्वितीय, गौरी डवरी तृतीय. यशस्वी धनुर्धर खेळाडूंना सावता घाडगे, दीपक चिकणे, विठ्ठल भालेराव, अजित वसेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अरविंद कोळी, रमेश शिरसट, सावता घाडगे, सचिन रणदिवे, अंकुश चोपडे, बाबासाहेब शेळके, सागर सुर्वे, हरीश पटेल, सागर सावंत, विठ्ठल माळी, दीपक शितोळे यांनी परिश्रम घेतले.

----

१८ मोडनिंब-स्पोर्ट

धनुर्विद्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूसोबत हरिदास रणदिवे, दीपक चिकणे, सावता घाडगे, विठ्ठल भालेराव, रमेश सिरसाट आदी.

Web Title: Archery competitions held at Aran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.