गणेश विसर्जन करणार आहात का ? जाणून घ्या सोलापुरातील विसर्जन ठिकाणांची माहिती
By Appasaheb.patil | Published: September 6, 2022 06:55 PM2022-09-06T18:55:01+5:302022-09-06T18:55:08+5:30
हिप्परगा तलाव 104 टक्के भरला असल्याने गणेश भक्तांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून गणेश विसर्जन शांततेत खाणीमध्ये करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
सोलापूर : यावर्षी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात होत आहे. 9 सप्टेंबर 2022 रोजी अनंत चतुर्दशी असल्याने यादिवशी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. हिप्परगा तलाव 104 टक्के भरला असल्याने गणेश भक्तांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून गणेश विसर्जन शांततेत खाणीमध्ये करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. जाणून घ्या...सोलापूर शहरातील विसर्जन करण्यात येणारी ठिकाणांची माहिती...
सोलापूर शहरात गणेश विसर्जन करण्यात येणारी ठिकाणे
गणपती घाट, कल्याणी कुंड, कंबर तलाव, (तीन कृत्रिम कुंड), म्हाडा विहीर विडी घरकुल, एमआयडीसी ओपन स्पेस प्रिसिजन फॅक्टरीजवळ (एक कृत्रिम कुंड), रामलिंग नगर विहीर, अशोक चौक, पोलीस मुख्यालय विहीर, मार्कंडेय उद्यान विहीर, विष्णू मिल विहीर, बसवेश्वरनगर विहीर (श्री अक्कलकोटे यांची), सुभाष उद्यान विहीर आणि हिप्परगा येथील खाण.
गणेश विसर्जनासाठी गणेश मुर्ती याठिकाणी जमा करा
विभागीय कार्यालय क्र. 1
सो.म.पा. शाळा नं. २१ न्यू बुधवार पेठ, वडार गल्ली समाज मंदिर, चंडक शाळा बाळे, जिल्हा परिषद शाळा वारद फॉर्म, प्रसन्न हॉल वसंत विहार, इंदिरा कन्या प्रशाला शिंदे चौक, सो.म.पा. शाळा क्र. ७ चौपाड, सो.म.पा. शाळा क्र. ९ पत्रा तालीम, विठ्ठल मंदिर जुनी पोलीस लाईन, शरदचंद्र पवार प्रशाला उमा नगरी, हुतात्मा स्मृती मंदिर, डॉ.कोटणीस स्मारक भैय्या चौक सोलापूर
विभागीय कार्यालय क्र. 2
रोशन प्रशाला, अंबिका समाज मंदिर राजीव किसान नगर, नागनाथ अल्ली महाराज, पिरॅमिड हॉल बी ग्रुप विडी घरकुल, संभाजीराव शिंदे प्रशाला, राज मेमोरियल इंग्रजी शाळा, जिल्हा परिषद शाळा शेळगी, जोशी गल्ली रविवार पेठ
विभागीय कार्यालय क्र. ३
जय भवानी प्रशाला भवानी पेठ, विभागीय कार्यालय क्र. ३, रविवार पेठ मराठी शाळा क्र. ८ विभागीय कार्यालय क्र. २ जवळ, गांधी नगर नं. २ येथील समाज मंदिर, विनोबा भावे झोपडपट्टी येथील ललीतांबा मंदिर, पावन गणपती कर्णिक नगर, एम.आय.डी.सी.आरोग्यनिरिक्षक ऑफिस,राजेश्वरी शाळा निवारा नगर
विभागीय कार्यालय क्र. ४
मार्कंडेय नगर जिल्हा परिषद शाळा, माधव नगर पद्ममारुती मंदिर, बुर्ला मंगल कार्यालय, गणेश मंदिर बोमडयाल शाळेजवळ, बोल्ली मंगल कार्यालय अशोक चौक, जि. प. शाळा, निलम नगर, सोन गुरजी प्रशाला बत्तुल प्रशाला लगत, मा. सदस्य श्री गुरुशांत धुत्तरगांवकर यांचे संपर्क कार्यालय, केंगनाळकर शाळा
विभागीय कार्यालय क्र. ५
राजस्व नगर सांस्कृतिक भवन, प्रगती लॉन्स, अथर्व मंगल कार्यालय, किल्लेदार मंगल कार्यालय, बालाजी मंगल कार्यालय, गोविंदश्री मंगल कार्यालय,शिवदारे कॉलेज, मातोश्री रखुमाबाई हत्तुरे मंगल कार्यालय, हत्तुरे मंगल कार्यालय, मारुती मंगल कार्यालय, कुसुमराज मंगल कार्यालय, समृध्दी गार्डन, पोस्ट बेसीक शाळा विजापूर रोड, रामलिंग नगर विहीर
विभागीय कार्यालय क्र. ६
सुंदराबाई डागा प्रशाला दमाणी नगर, जि. प. शाळा देगांव, थोबडे वस्ती समाज मंदिर थोबडें वस्ती,जांबमुनी समाज मंदिर सोनी नगर, उत्कर्ष नगर मनपा शाळा, मनपा शाळा क्र.२८ सुंदरम नगर, एक्झिबिशन सेंटर मरिआई चौक
विभागीय कार्यालय क्र. ७
प्र.क्र.१६ मोदी शाळा बिंग बाजार समोर, प्र.क्र.२२ रामवाडी शाळा, मनपा शाळा ३ दक्षिण कसबा, भुई समाज मंदिर शुक्रवार पेठ, प्र.क्र. १५ आंबेडकर शाळा एम्प्लायमेंट चौक (खाजगी), शिवनुभव मंगल (खाजगी)
विभागीय कार्यालय क्र. ८
जोडबसवण्णा चौक शाळा नं.६, पोलिस मुख्यालय लगत एमपीएससी अभ्यास केंद्र, वॉर्ड ऑफिस म्हेत्रे, इन्डोअर स्टेडिअम अश्विनी हॉस्पीटल जवळ, वसंतराव नाईक शाळा, लोधी गल्ली शाळा नं.१४ समाज मंदिर जवळ, सतनाम चौक ललीत कला केंद्र, म. बेकरी शास्त्री नगर समाज मंदिर महादेव मंदिर, ५ नं. शाळा इंदिरा नगर, ७० फुट रोड मस्जीद जवळ समाज मंदिर, शास्त्री नगर तायम्मा मंदिर, जांबमुनी समाज मंदिर अलकुंटे चौक, बापूजी नगर हनुमान मंदिर, गणेश मंदिर हॉल विकास नगर पोस्टल कॉलनी परिसरात, वॉर्ड ऑफिस नल्लामंदु, कॅम्प शाळा, सुभाष उदयान विहीरीलगत, बालाजी मंदिर मुर्गी नाला भाजी मार्केट