उसाचे क्षेत्र वाढले; तोडणीचा प्रश्न कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:20 AM2020-12-24T04:20:10+5:302020-12-24T04:20:10+5:30
चालू वर्षी जून महिन्यापासून पावसाने चांगलाच जोर धरला होता. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये तालुक्यातील विविध भागात झालेली अतिवृष्टी, टेंभू योजनेतून ...
चालू वर्षी जून महिन्यापासून पावसाने चांगलाच जोर धरला होता. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये तालुक्यातील विविध भागात झालेली अतिवृष्टी, टेंभू योजनेतून माण नदीत सोडलेल्या पाण्यामुळे तालुक्याच्या अनेक भागात काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. याचा परिणाम माण व कोरडा नदीवरील सर्व बंधाऱ्यांसह छोट्या-मोठ्या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. झालेल्या पावसाच्या व बंधाऱ्यात अडविलेल्या पाण्याच्या पाझरामुळे सध्या भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढली आहे.
दोन वर्षे तरी पाण्याची कमतरता नाही
विहिरी, कुपनलिकेसह शेततळ्यात पाण्याचा स्रोत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे भविष्यात किमान दोन वर्षे तरी पाण्याची कमतरता भासणार नाही. याचा परिणाम डाळिंब, पेरू, बोर, सीताफळ व द्राक्ष या बागांबरोबरच माण व कोरडा नदीकाठच्या भागात सुमारे ५९८.४० हेक्टर क्षेत्रावर आडसाली उसाची लागण झाली आहे.