शवविच्छेदन अहवालात मयताची तारीख, वेळ नमूद नसल्याचा युक्तिवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:18 AM2020-12-25T04:18:28+5:302020-12-25T04:18:28+5:30
विशेष म्हणजे जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी संशयितांतर्फे न्यायालयासमोर युक्तिवाद करताना ॲड. प्रशांत शेटे यांनी पोलिसांचा व वैद्यकीय अहवाल सादर ...
विशेष म्हणजे जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी संशयितांतर्फे न्यायालयासमोर युक्तिवाद करताना ॲड. प्रशांत शेटे यांनी पोलिसांचा व वैद्यकीय अहवाल सादर केला. त्यात मयताचा रंग व वयात बराच फरक असल्याचे व शवविच्छेदन अहवालात मयताची तारीख व वेळ नमूद नाही. बेपत्ता आढळलेल्या आणि मिळालेला संशयित यांच्यातील बराच फरक दिसत आहे. शिवाय यातील संशयितांच्या मुलीचा दोन दिवसांनी विवाह असताना त्यांना अटक केली होती, असे म्हटले आहे. यावरून न्यायालयांनी त्यांचा जामीन मंजूर केला.
पांगरी शिवारातील जैनुद्दीन शेख यांच्या विहिरीत ऑगस्टमध्ये अनोळखी प्रेत कुजलेल्या अवस्थेत तरंगत असल्याची माहिती पांगरी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट यांनी शिवाजी बोकेफोडे, रवी बोकेफोडे (दोघे रा. धोत्रे) व आबा ऊर्फ राहुल माने (रा. पिंपळगाव) यांच्यावर भा. दं. वि. ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करून त्यांना संशयित म्हणून अटक केली होती. यावर न्यायालयांनी या संशयित तिघांचे वैयक्तिक ३० हजारांचे बांधपत्र व प्रत्येकी १५ हजारांच्या दोन जातमुचलक्याच्या अटीवर जामीन अर्ज मंजूर केला.