फरशी पुसण्यावरून वाद, सासूने सुनेचा दात पाडला! तिघांविरूद्ध 'एमआयडीसी' पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By संताजी शिंदे | Published: July 19, 2024 06:57 PM2024-07-19T18:57:41+5:302024-07-19T18:58:05+5:30

रेशीना नजीरअहमद बागवान (वय २६ रा. सग्गम नगर) या ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या रोजा जोडण्याच्या वेळेस घरात काम करीत  होत्या.

Argument over cleaning the floor, mother-in-law knocked out daughter-in-law's tooth! A case has been registered against the three in 'MIDC' police station | फरशी पुसण्यावरून वाद, सासूने सुनेचा दात पाडला! तिघांविरूद्ध 'एमआयडीसी' पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

फरशी पुसण्यावरून वाद, सासूने सुनेचा दात पाडला! तिघांविरूद्ध 'एमआयडीसी' पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर : मुळेगाव रोडवरील सग्गम नगरातील राहत्या घरातील फरशी व्यवस्थित का पुसली नाही, असे म्हणत सासूने तोंडावर ठोसा मारून सुनेचा दात पाडला. या प्रकरणी सासूसह सासरा व दिरावर गुन्हा दाखल झाला आहे.

       रेशीना नजीरअहमद बागवान (वय २६ रा. सग्गम नगर) या ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या रोजा जोडण्याच्या वेळेस घरात काम करीत  होत्या. दरम्यान सासनूे सुन रेशीना यांना फरशी व्यवस्थित साफ का केली नाही असे विचारले. पुन्हा साफ कर असे म्हणाली यातून दोघींमध्ये शाब्दीक चकमक  झाली. चिडलेल्या सासूने रेशीना यांच्या तोंडावर जोरात ठोसा मारला. त्यात त्यांच्या उजव्या बाजूचा एक दात तुटला. दरम्यान दिराने केसाला पकडून ढकलून दिले. त्यात त्यांच्या तोंडाला व हाताला मार लागला.

       पत्नीला मारहाण होत असल्याचे पाहून पती नजीरअहदम बागवान हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेले. भांडण करू नका असे ते सांगत असताना, त्याचे आई व वडील दोघांनी मुलाला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. अशी फिर्याद रेशिना बागवान यांनी दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून सासू- आसमा मुक्त्यार बागवान, दीर- इब्राहिम बागवान व सासरा- मुक्त्यार बागवान (सर्व रा. सग्गम नगर विडी घरकूल, सोलापूर) यांच्या विरूद्ध 'एमआयडीसी' पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा एप्रिल-२०२४ मध्ये गुन्हा घडल्याने पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३२५, ३४ लावले आहे. तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
 

Web Title: Argument over cleaning the floor, mother-in-law knocked out daughter-in-law's tooth! A case has been registered against the three in 'MIDC' police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.