नागरिकांसह शेतकºयांच्या सुविधांसाठी पेट्रोल अन् डिझेलची व्यवस्था करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 02:50 PM2020-03-26T14:50:41+5:302020-03-26T14:54:09+5:30

माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची जिल्हा प्रशासनाला मागणी

Arrange for petrol and diesel for the convenience of farmers including citizens | नागरिकांसह शेतकºयांच्या सुविधांसाठी पेट्रोल अन् डिझेलची व्यवस्था करा

नागरिकांसह शेतकºयांच्या सुविधांसाठी पेट्रोल अन् डिझेलची व्यवस्था करा

Next
ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्यात १४४ कलम (संचारबंदी) लागू- जीवनाश्यक वस्तू वगळता सर्वच दुकाने बंद- शहरासह ग्रामीण भागात पोलीसांचा मोठा पोलीस बंदोबस्त

सोलापूर : कोरोनामुळे देशभरात पंतपधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसाचा लॉकडाउन जाहीर केला आहे़ या लॉकडाउनमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे़ सर्वसामान्य नागरिकांसह शेतीची कामे खोळंबली आहेत़ जिल्हा प्रशासनाने तातडीने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकºयांच्या सुविधांसाठी पेट्रोल अन् डिझेलची व्यवस्था करावी अशी मागणी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

सध्या शेतकºयांच्या शिवारातील गहू काढणीस आलेला आहे. कोरोना संसर्गाच्या संकटामुळे गहू काढणीवर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. त्याशिवाय अवकाळी पावसाच्या झळाही गहू शेतीला बसत आहेत. अशा बिकट अवस्थेत शेतकºयांचा गहू तत्काळ काढणे गरजेचे आहे. त्यासाठी गहू हार्वेस्टिंग मशीनला परवानगी मिळावी व त्यासाठी लागणारे डिझेल उपलब्ध व्हावे, कोरोनामुळे शेती व्यवस्था कमालीची अडचणीत आली आहे. शेतीच्या मशागती व शेतमाल वाहतूक करणारी वाहने व  शेती व्यवस्थेशी संबंधित इतर वाहनांना डिझेल पुरवण्याची व्यवस्था ठराविक पंपांवर व्हावी.

पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्य व पशुखाद्य याची वाहतूक करणाºया वाहनांना ठराविक पेट्रोल पंपावरती डिझेल उपलब्ध व्हावे, अत्यावश्यक सेवेत समावेश असलेल्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची घरपोच सेवा सुरू राहण्यासाठी डिझेल उपलब्ध व्हावे, सध्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व ग्रामपंचायत स्तरावर निजंर्तुकीकरणासाठी फवारण्या सुरू आहेत. त्या फवारण्यांसाठीही डिझेल उपलब्ध व्हावे अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे़ या मागणीचा तात्काळ अंमल व्हावा असेही मोहिते-पाटील यांनी म्हटले आहे.


 

Web Title: Arrange for petrol and diesel for the convenience of farmers including citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.