तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शंभर ऑक्सिजन बेडची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:22 AM2021-05-26T04:22:56+5:302021-05-26T04:22:56+5:30
तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित होण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना होण्याच्या दृष्टीने आरोग्याची जरूर ...
तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित होण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना होण्याच्या दृष्टीने आरोग्याची जरूर ती उपाययोजना व सुविधा प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. याचा विचार करून ग्रामीण रुग्णालय माढा, ग्रामीण रुग्णालय कुर्डूवाडी, ग्रामीण रुग्णालय करकंब व प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंग या शासकीय रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेड तर कुर्डूवाडी येथील डॉ. बोबडे हॉस्पिटल, डॉ. साखरे हॉस्पिटल व डॉ. माने यशश्री हॉस्पिटल, टेंभुर्णी हे सर्व बालरोग तज्ज्ञ त्यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये ५० बेड तयार करून ठेवणार आहेत. सध्या तालुक्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये ३०० बेड रिक्त तर खासगी हॉस्पिटलमध्ये ७५ ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत.
---
तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
सुरुवातीच्या टप्प्यात शासकीय हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटल यामध्ये शंभर ऑक्सिजन बेडची व्यवस्था असलेली डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवणे, ऑक्सिजन व इतर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध राहणार आहेत.
---