घरात कुंटणखाना चालवणाऱ्याला अटक, पीडितेची सुटका
By रूपेश हेळवे | Published: March 24, 2023 07:15 PM2023-03-24T19:15:21+5:302023-03-24T19:15:36+5:30
सोलापूर : विडी घरकुलमधील आशा नगरात घरात कुंटणखाना चालवण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाला मिळाली. या माहितीवरून ...
सोलापूर : विडी घरकुलमधील आशा नगरात घरात कुंटणखाना चालवण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून एका आरोपीला अटक केली असून पीडितेची सुटका केली आहे. दिलीप सिध्दप्पा मंगरुळे ( वय ४०, रा. सुनील नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला वरील ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी वरील ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी एका पीडितेची सुटका केली. आरोपी हा पीडितेला पैशाचे आमिष दाखवून तिला वेश्या व्यावसाय करण्यास भाग पाडत तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होता. त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३१ मार्च पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.