दाभोळकर, पानसरे, कलबुर्गींच्या खुनातील सुत्रधारांना अटक करा!
By संताजी शिंदे | Updated: June 9, 2024 19:11 IST2024-06-09T19:10:56+5:302024-06-09T19:11:04+5:30
मॉर्निंग वॉक : जवाब दो आंदोलन कृती समितीची रॅली

दाभोळकर, पानसरे, कलबुर्गींच्या खुनातील सुत्रधारांना अटक करा!
सोलापूर : डॉ. नरेंद्र दोभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या खुन्यांना व त्या मागील सनातनी सुत्रधारांना अटक करा अशी मागणी करीत, जवाब दो आंदोलन कृती समितीच्या वतीने शहरातून रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करण्यात आला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये निर्भय मोर्निग वॉक काढण्यात आला. श्राविका प्रशाला येथील हिराचंद नेमचंद कार्यालयापासून मॉर्निंग वॉकला सुरूवात करण्यात आली. सम्राट चौक येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तेथून हा वॉक डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पर्यंत आला. मॉर्निंग वॉक दरम्यान डॉ. नरेंद्र दाभोळकर अमर रहे, माणूस मारता येतो...विचार मारता येत नाही. लढेंगे जितेंगे...आवाज दो हम एक है! आदी घोषणा देण्यात आल्या. यामध्ये नागरिकांनी उर्त्स्फूतपणे सहभाग घेतला.
मॉर्निंग वॉकमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोळकर, मुक्ता दाभोळकर, मिलिंद देशमुख, प्रशांत पोतदार, नंदीनी जाधव, अण्णा कडलसकर, फारुख गवंडी, डॉ. अशोक चव्हाण, डॉ. अस्मिता बालगावकर, उषा शहा , शंकर खलसोडे, लालनाथ चव्हाण, अंजली नानल, मधुरा सलवारू, निशा भोसले, व्ही डी गायकवाड, आर डी गायकवाड, केदारी सुरवसे, शकुंतला सुर्यवंशी, सुनीता गायकवाड कुंडलिक मोरे, ब्रम्हानंद धडके, अरुण गायकवाड, संजीवनी देशपांडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.