बनावट नोटा तयार करणाºयास पंढरपुरात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 02:00 PM2019-09-15T14:00:16+5:302019-09-15T14:03:44+5:30
पंढरपुरातील घटना : मशिनसह ११,५०० रूपयांच्या बनावट नोटा जप्त
पंढरपूर : बनावट नोटा तयार करून पंढरपुरातील बाजारात वापरात आणण्यासाठी आलेल्या तरूणास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता दोन हजार, ५०० रूपये, १०० रूपये, ५० रूपयांच्या अशा एकूण ११,५५० रूपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. बनावट नोटा तयार करणाºया मशिनसह सर्व रक्कम जप्त केली.
१३ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताच्या अनुषंगाने काही पोलीस खाजगी मोटारसायकलवरून पेट्रोलिंग करीत असताना केबीपी कॉलेज चौकात उभा होता. पोलिसांना संशय आल्याने त्याच्याकडे नाव, गाव याबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करीत होता. त्यानंतर त्यास शहर पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान पुन्हा त्यास विचारणा केली असता रणजित सुखदेव राजगे (वय २२, रा. कुसमोड, पो. पिलीव, ता. माळशिरस) असे सांगितले.
त्याच्याजवळील बॅग तपासली असता दोन हजार रूपयांच्या २ नोटा, ५०० रूपयांच्या १० नोटा, १०० रूपयांच्या १९ नोटा, ५० रूपयांच्या १३ नोटा अशा एकूण ११,५५० रूपयांच्या बनावट नोटा त्याच्याकडे आढळून आल्या.
या नोटा बनावट आहेत की नाहीत, याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ पंच व स्टेट बॅँकेच्या अधिकाºयांना बोलावून घेतले. अधिकाºयांनी नोटांसाठी वापरलेला कागद जाड व रफ असल्याने तो बनावट आहे शिवाय अन्य चाचण्या केल्यानंतर त्या नोटा बनावट असल्याचे सांगितले. सहाय्यक पोलीस फौजदार हनुमंत देशमुख यांनी पंचनामा करून त्या तरूणावर शहर पोलीस ठाण्यात गुरनं १४८१/२०१९ भादंवि कलम ४८९ अ, ४८९ क व ४८९ इ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
त्या तरूणाच्या घराची झडती घेतली असता कलर प्रिंटर, विविध रंगाच्या शाईच्या चार बाटल्या, नोटांचे अर्धवट प्रिंट असलेले कागद, तीन मोबाईल, १४ सीमकार्ड मिळून आले. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. ही कामगिरी गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि नवनाथ गायकवाड, सपोफौ हनुमंत देशमुख, पोहेकॉँ सुजित उबाळे, पोना मच्छिंद्र राजगे, पोना संदीप पाटील, पोना प्रसाद औटी, पोना अभिजीत कांबळे यांनी केली. अधिक तपास सपोनि नवनाथ गायकवाड करीत आहेत.