द्राक्षे कलिंगडाची आवक; उन्हाळी फळे हिवाळ्यातच बाजारात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 06:56 PM2021-11-22T18:56:49+5:302021-11-22T18:56:55+5:30
पालेभाज्या पाच ते दहा रुपये पेंडी
सोलापूर : उन्हाळ्यात कलिंगड, द्राक्षे सारखी थंड फळे बाजारात येत असतात. पण सध्या हिवाळ्यातच ही थंड फळे बाजारात दाखल झाली आहेत. बाजारात दाखल झालेल्या द्राक्षाला ६० ते ८० रुपये प्रति किलो दर व कलिंगडाला २० ते ३० रुपये दर मिळत आहे. तर भाज्यांचे दर कमी झाल्याने भाज्यांची मागणी वाढली आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मागील अनेक दिवसांपासून फळभाज्यांचे दर ६० ते ८० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले होते. हे दर आता ४० ते ५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. मागील अनेक दिवसांपासून वांगे, दोडके, गवार, कारले हे जवळपास साठ ते सत्तर रुपये किलो दराने विकले जात होते. हे दर आता ४० ते ५० रुपये किलोपर्यंत कमी झाले आहेत. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात फळांची आवक वाढल्यामुळे दर घसरले आहेत. पण सध्या बाजारात टोमॅटोची आवक कमी असल्यामुळे यांचे दर ५० ते ६० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. बाजारात आवक वाढल्यास हे दर कमी होतील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फळभाज्यांचे दर (प्रति किलो)
- बटाटे २५
- टोमॅटो ५०
- काकडी ४०
- वांगे ४०
- दोडका ४०
- गवार ५०
- गाजर ५०
- कारले ४०
- भेंडी ५०
- शिमला ३०
- कांदा २५
- लसूण ५०
- फ्लॉवर ३० नग
मिरची ४०
फळांचे दर
- द्राक्षे ६०
- कलिंगड २०
- सफरचंद १००
- पेरू ३०
- सीताफळ ५०
- मोसंबी ६०
सध्या बाजारामध्ये उन्हाळी फळे जसे की द्राक्षे, कलिंगड दाखल होत आहेत. या फळांना सध्या मागणी कमी आहे. सोबतच कलिंगडही आता जवळपास उन्हाळ्याशिवाय इतर मौसममध्येही आढळत आहेत.
^ अमन बागवान, फळ विक्रेते
सध्या पालेभाज्यांचे दर कमी झाले असून यामुळे ग्राहकांचा पालेभाज्यांकडे ओढा वाढला आहे. सध्या सर्वच पालेभाज्या या पाच ते दहा रुपये पेंडी दराने विकल्या जात आहेत.
अर्जुन हांडे, भाजी विक्रेते