माऊलीच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

By admin | Published: July 9, 2016 06:08 PM2016-07-09T18:08:29+5:302016-07-09T18:21:31+5:30

हरिनामाचा जयघोष करत गेले दहा दिवस वाटचाल करणा-या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याने शनिवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला

Arrival of Mauli Palkhi in Solapur district | माऊलीच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

माऊलीच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

Next
>ऑनलाइन लोकमत - 
सोलापूर, दि. 09 - भागवत धर्माची पताका उंचावत अन अखंड हरिनामाचा जयघोष करत गेले दहा दिवस वाटचाल करणा-या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याने शनिवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख व कॅबिनेट मंत्री सुभाष देशमुख यांनी धर्मपुरी येथे पालखीचे स्वागत केले.
 
३५० दिंड्या, दोन अश्व, चांदीचा रथ, नगारखाना असा वैभवी लवाजमा आज पालखी येणार म्हणून स्वागताला सोलापूर जिल्हा सज्ज होता. धर्मपुरी येथे स्वागत कमान उभारण्यात आली होती. रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. राजश्री जुन्नरकरसह स्थानिक कलाकारांनी काढलेल्या रांगोळ्या मनमोहक होत्या. स्वच्छता दूत व कलापथकाची तुफान बॅटींग सुरू होती़ माऊलीच्या आगमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या भक्तांसाठी तो एक करमणुकीची मेजवानी होती. पालखीच्या स्वागतासाठी आलेले जिल्हाधिकारी रणजितकुमार,  जि़ प अध्यक्षा जयमाला गायकवाड, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, आमदार हणमंत डोळस, पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू, प्रभारी सीईओ पोपट बनसोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सचिन कल्याणशेट्टी, आ़ प्रशांत परिचारक आदी विविध विभागाचे प्रमुख, राजकीय मंडळी उपस्थित होते.
 
सकाळपासूनच बिगर क्रमांकाच्या दिंड्या पुढे येवून कॅनॉलवर जमल्या होत्या.  सकाळी १०.३० वाजता माऊलीच्या रथापुढील चौघडा आला तेव्हा अवघ्या मंडपाचे लक्ष तिकडे गेले. चौघडया पाठोपाठ २७ नंबर दिंडी त्यापाठोपाठ दोन्ही अश्व येताच अवघे मान्यवर दोन्ही अश्वासमोर नतमस्तक झाले़ दोन्ही अश्वांचे हार घालून स्वागत झाल्यानंतर एकेक करून २६ दिंड्या पुढे गेल्यानंतर माऊलीच्या चांदीचा रथ आला. रथामध्ये विराजमान माऊलीच्या पादुकावर नतमस्तक होत सर्व मान्यवरांनी वैष्णवी सोहळ्याचे स्वागत केले.
 
आज सकाळपासूनच पावसाने पूर्णत विश्रांती दिली असली तरी ढगाळ वातावरणात वाटचाल चांगली झाली. सकाळच्या विसाव्याला साधुबुवाच्या ओढ्याजवळची न्याहरी उरकून दुपारच्या भोजनाला सोहळा धर्मपुरी बंगला येथे विसावला. शिखर शिंगणापूरच्या डोंगरावरून येणारे गार वारे झेलत आणि शिवशंभुनी आळवणी करत वारकºयांनी दुपारची वाटचाल केली.
शिंगणापूर फाटा येथील विश्रांती वगळता आज दुपारनंतर शंभूमहादेवाचे कापडियाचे अभंग ऐकायला मिळाले. तिन्ही सांजेला सोहळा नातेपुते नगरात दाखल होताच नातेपुते करांनी माऊलीचे हर्षभरे स्वागत केले.
 
रिंगण पुरंदावडे येथे
माऊलीच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण रविवारी दुपारी सदाशिवनगरऐवजी पुरंदावडे येथील नवीन जागी होणार आहे.  मांडवे ओढ्यावर दुपारचे भोजन उरकून दुपारी सोहळा माळशिरसकडे रवाना होईल.
आमच्या घरातच वारकरी परंपरा आहे़ कालच माझा मंत्री मंडळात समावेश झाला आणि आज मला माऊलीचे स्वागत घरी न जाता करण्याची संधी मिळाली़ मुंबईहुन मी थेट वारकºयांच्या चरणी लीन होण्यासाठी आलो हे मी माझे भाग्यच समजतो़
-सुभाष देशमुख, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य़
 
 
रिंगणावेळी पोलिसांना सहकार्य करा
माऊलीच्या सोहळ्यातील रिंगणाचा सोहळा बघण्यासारखा असतो़ मात्र प्रेक्षकांनी वारकºयांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी बसावे व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन राजाभाऊ चोपदार यांनी केले. रिंगणाच्या ठिकाणी पालखी, पतकाधारी आणि दिंडीकरी यांच्या विशिष्ट जागा असतात. प्रेक्षकांसाठी विशिष्ट जागा असतात़ प्रेक्षकांनी प्रेक्षकांच्या जागेत बसून रिंगण पहावे म्हणजे पोलिसांवरचा ताण कमी होईल व रिंगण परंपरेप्रमाणे होईल़ रिंगणात अश्व उधळण्याचीही भीती असते़ तेव्हा सावध रहावे असं राजाभाऊ चोपदार बोलले आहेत.
 
रिंगण सोहळ्याची मेजवानी
सोलापूर जिल्ह्यात उदयापासून प्रेक्षकांना रिंगणाची मेजवानीच आहे. रविवारी पुरंदावडेला पहिले रिंगण झाल्यानंतर सोमवारी खूडूस पाटीला तर मंगळवारी ठाकूरबुवाची समाधी उघडेवाडी येथे गोल रिंगण होणार आहे. 
 

Web Title: Arrival of Mauli Palkhi in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.