बाहेरच्या जिल्ह्यातून होतेय डाळिंबाची आवक

By admin | Published: July 20, 2014 12:52 AM2014-07-20T00:52:37+5:302014-07-20T00:52:37+5:30

उत्पादन खर्च वाढलेलाच: आवक वाढल्याने भाव खाली

The arrival of pomegranate from the outer district | बाहेरच्या जिल्ह्यातून होतेय डाळिंबाची आवक

बाहेरच्या जिल्ह्यातून होतेय डाळिंबाची आवक

Next

 सोलापूर: आंबे बहारात धरलेल्या डाळिंबावर रोगांचा प्रादुर्भाव कमी झाल्याने डाळिंबाचे उत्पादन चांगले आले असून, सोलापूर बाजार समितीमध्ये मागील पंधरवड्यापासून आवकही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. उत्पादन खर्च वाढला असताना दर खाली आल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. परजिल्ह्यातून डाळिंबाची मोठ्या प्रमाणावर आवक असल्याचे सांगण्यात आले.
मागील दोन-तीन वर्षे दुष्काळामुळे शेतकऱ्यांसाठी चांगलीच अडचणीची ठरली आहेत. पाण्याच्या टंचाईने ऊस पीक व अन्य पिकांचे उत्पादन म्हणावे तसे घेता आले नाही. उत्पादन खर्चाच्या पटीत शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडत नाहीत. अशातही डाळिंब पीक शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याचे ठरले आहे, परंतु मागील १५-२० दिवसात डाळिंबाचा दरही खाली आला आहे. मागील १५ दिवसाखाली चांगल्या डाळिंबाचा दर किलोला १०० ते १२० रुपये होता तो सध्या ८० ते ९० रुपयांवर आला आहे.
----------------------
सांगोला, पंढरपुरातूनही येतात डाळिंब
४शनिवारी सोलापूर बाजार समितीमध्ये १२ हजार कॅरेट डाळिंबाची आवक झाली होती.
४उन्हाळ्यात चार ते पाच हजार कॅरेटची असणारी आवक मागील २० दिवसांपासून १२ ते १४ हजार कॅरेटवर गेली आहे.
४एक नंबर डाळिंबाचा दर १०० ते १२० वरुन ८० ते ९० रुपयांवर आला
४ इंदापूर, नाशिक, बारामती, बीड, माळशिरस, अहमदनगर व इंडीच्या डाळिंबाची बाजार समितीत आवक
४सांगोला व पंढरपूर तालुक्यातूनही येतात डाळिंब विक्रीला
------------------------------
आंबे बहारात धरलेल्या डाळिंबाला चांगला माल आला आहे. तेल्या व अन्य रोगराईचा प्रादुर्भाव कमी झाल्याने चांगले उत्पादन आले आहे. यामुळे डाळिंबाची आवक वाढली आहे.
-डॉ. देवदास मेश्राम
वरिष्ठ वैज्ञानिक,
--------------------------------
जिल्ह्यात व राज्यात डाळिंबाची लागण खूप वाढली, यापुढेही वाढत राहील, पुढील काही दिवसात बाजारात डाळिंबच दिसेल. भाव आणखीन कमी होण्याची शक्यता आहे.
-प्रभाकर चांदणे
अध्यक्ष डाळिंब उत्पादन संघ
--------------------------------
सोलापूर बाजार समितीमधील डाळिंबाची खरेदी पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, ओरिसाचे व्यापारी करीत आहेत. आलेल्या सर्व डाळिंबाची खरेदी होते. आडत पूर्वी आठ टक्के होती ती आता सहा टक्के कपात केली जाते.
-सलाम खलिफा
अडत व्यापारी
 

Web Title: The arrival of pomegranate from the outer district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.