सयाजीराजे पार्क येथे कंपन पक्षांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:18 AM2021-01-14T04:18:52+5:302021-01-14T04:18:52+5:30
यावेळी डॉ. अरविंद कुंभार म्हणाले, कस्तूरिका कुलातील या पक्षाला इंग्रजीत रेड स्टार्ट असे नाव आहे. मे व जून महिन्यात ...
यावेळी डॉ. अरविंद कुंभार म्हणाले, कस्तूरिका कुलातील या पक्षाला इंग्रजीत रेड स्टार्ट असे नाव आहे. मे व जून महिन्यात विणीवर जाणारे हे पक्षी हिमालयात होणाऱ्या बर्फवृष्टीपासून बचाव करून घेण्यासाठी डिसेंबर-जानेवारीमध्ये भारतीय उपखंडातील महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात स्थलांतर करून येतात. हे पक्षी दरवर्षी ठरलेल्या ठिकाणी येऊन राहतात. जोडीने आलेले हे चिमुकले पक्षी उन्हाळा संपेपर्यंत एकाच ठिकाणी राहून पावसाळ्याच्या प्रारंभी मूळ ठिकाणी परत जातात.
या पक्ष्यांतील वैशिष्ट्य म्हणजे नर व मादी दोन्ही मधील शेपटी एखाद्या मद्यपी किंवा क्रोधीत व्यक्तीचे हात जसे थरथरतात तसे थरथरते. याच कारणावरून या पक्षाला कंपनपक्षी असे नाव पडले आहे. नर पक्षी रुबाबदार असून त्याचे डोके, पाठ व पंख कुळकुळीत काळ्या रंगाचे असतात. छातीला केशरी रंगाची छटा असते. मादी पूर्णपणे फिकट रंगाची असून तिच्या डोळ्याभोवती पिवळसर वलय असते. यामुळे या पक्षातील नर-मादीतील फरक सहज ओळखता येतो.
वृक्षराजीमुळे पक्षांचे आकर्षण
कंपन पक्षांची जोडी सकाळी व संध्याकाळच्या वेळी पार्कमधील विस्तृत हिरवळ व बोटिंगच्या पायरीजवळ भक्ष्य मटकावत वावरतानाचे दृश्य मनोहारी वाटते. पार्कमध्ये वाढलेल्या सुशोभित वृक्षराजीत चिमणीवर्गीय अनेक स्थानिक तथा स्थलांतरित पक्षी आकर्षित होतात, असे सयाजीराजे पार्कच्या व्यवस्थापिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी सांगितले.
कोट ::::::::::::::
कंपन पक्षी सयाजीराजे पार्कमध्ये २००९ पासून दरवर्षी जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात हमखास येतात, हे आमच्या निरीक्षणावरून लक्ष्यात आले आहे. आम्ही सदर पक्ष्यांच्या खाद्य सवयी, राहनीमान व त्याच्या परतीचा प्रवास इत्यादी घटनाक्रमांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.
- ऋतुराज कुंभार,
स्थानिक पक्षी निरीक्षक